Savitribai Phule Pune University | परीक्षा अर्जात विद्यापीठाचा घोळ

विद्यार्थ्यांना मनस्ताप : विद्यापीठ विभागांची एकमेकांवर टोलवाटोलवी
Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune University Pudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सध्या ऑक्टोबर २०२४चे पत्रकारिता प्रथम वर्षे (एनईपी २०२४), विज्ञान शाखेसह इतरही शाखांचे परीक्षा अर्ज भरण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पण या लिंकमध्ये संबंधित शाखांच्या विषयांचा समावेश नसल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नाही.

Summary

जुन्या आणि नव्या (एनईपी) अभ्यासक्रम रचनेमुळे हा सारा घोळ झाला असून, विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून, मनस्ताप सहन करावा लागत आहे.

परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू असून, विद्यापीठाच्या परीक्षा लिंकमध्ये संबंधित शाखांच्या विषयांचा समावेश नसल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. याप्रकरणी विद्यापीठाकडून कॉलेज, विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही. तसेच संबंधित शाखांचे, परीक्षा आणि आयटी विभाग हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अभ्यासक्रम परीक्षेतील घोळ हे जणू समीकरणच झाले आहे. दरवर्षी विद्यापीठाचा कुठल्यातरी विषयात भोंगळ कारभार होतो आणि त्याचा नाहक फटका महाविद्यालय, विद्यार्थ्यांना बसतो. सध्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखांपैकी काही शाखांचे अर्ज भरणे सुरू झाले असून, पत्रकारिता, विज्ञान, इंजिनिअरिंग शाखांचे ऑक्टोबर २०२४ च्या परीक्षांचे अर्ज भरणे सुरू आहे. पत्रकारितेच्या परीक्षा अर्ज भरण्याची लिंक १७ ऑक्टोबरला खुली करण्यात आली. ती विनाविलंब गुरुवार (दि. २४)पर्यंत खुली आहे. त्यानंतर शनिवार (दि. २६)पर्यंत विद्यार्थी विलंब शुल्काने अर्ज भरू शकतात. मात्र पहिल्या दिवसापासूनच या लिंकवर बी-फार्म २०१९ पॅटर्नचे विषय दिसत आहे. त्यामुळे विषय निवडता येत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

जुन्या नव्या विषयांचा घोळ

यंदाच्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी पॅटर्न २०२४) विषय आहेत. तर जुन्या बॅचला (२०१९ पॅटर्न) विषय आहे. विद्यापीठात फक्त पत्रकारिता विभागात गेल्या वर्षी एनईपी पॅटर्न आणि त्यासंदर्भातील विषय लागू झाले. मात्र इतरत्र यंदाच्या वर्षी हा अभ्यासक्रम लागू झाला. त्यामुळे जुन्या नव्या विषयांचा घोळ सुरू असल्याने प्रथम वर्षाचे अर्ज भरताना हवे ते विषय दिसत नसून, जुने विषय दिसत असल्याने विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

पत्रकारिता, विज्ञान विषयाच्या परीक्षा अर्जाच्या तारखा जाहीर करून अतिघाई केल्याने हा मनस्ताप आम्हाला सहन करावा लागत आहे. चूक विद्यापीठाची आणि विलंब शुल्काच्या रूपाने भुर्दंड आम्हाला हे योग्य आहे काय याचा विचार विद्यापीठाने करावा.

डॉ. योगेश कुलकर्णी, विद्यार्थी, नाशिक.

परीक्षा अर्जातील त्रुटी दूर करून गैरसोय टाळण्यासाठी अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल. शिवाय मुदत वाढवूनही मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे.

सागर वैद्य, मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर, पुणे विद्यापीठ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news