

नाशिक : स्वहस्ते तयार केलेल्या वस्तूंविषयी मुलांना नेहमीच आकर्षण असते, विशेषतः राखीसारख्या कलात्मक गोष्टींबाबत तर त्यांची उत्सुकता अधिकच वाढते. जर ही राखी सरहद्दीवरील सैनिकांसाठी असेल, तर त्यांच्या आनंदाला तोड राहत नाही. सावाना सानेगुरुजी व्याख्यानमाला बालभवन आयोजित राखी निर्मिती स्पर्धेमध्ये हा आनंददायक अनुभव सर्वांनी घेतला.
सावाना बालभवनतर्फे रविवारी (दि. ३) राखी निर्मिती स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या कर्नल शशांक सरोदे यांच्या मार्फत सीमावर्ती भागातील सैनिकांना पाठविण्यात येणार आहेत. सरोदे यांनी पालक आणि संस्थेचे कौतुक करताना अशा उपक्रमातून मुलांना वास्तवाशी जोडण्याची संधी मिळते, असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तंत्र सोप्या आणि हसतखेळत शैलीत समजावून सांगितले.
बालभवन प्रमुख प्रेरणा बेळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुनेत्रा मांडगवणे यांनी, तर अर्थसचिव गिरीश नातू यांनी आभार मानले. आरती कुलकर्णी व मेधा जोग यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
यावेळी ‘सावाना’चे कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, सहाय्यक सचिव प्रा.सोमनाथ मुठाळ, नाट्यगृह सचिव जयेश बर्वे, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, पुस्तक मित्र मंडळ मंगेश मालपाठक तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
प्रथम गट (पाचवी ते दहावी)
प्रथम : पर्णवी सारंग (रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम स्कूल)
व्दितीय : गार्गी काशीकर (सीडीओ मेरी हायस्कूल)
तृतीय : विनीत विसपुते (विद्या प्रबोधिनी प्रशाला, भोसला मिलिटरी स्कूल)
उत्तेजनार्थ : चिन्मयी थोरात (सीडीओमेरी हायस्कूल), शुभम म्हस्के (पेठे विद्यालय), आर्या आंबेवाडीकर (रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम स्कूल)
प्रथम : अभिज्ञा ठाकरे (सीडीओ मेरी हायस्कूल)
व्दितीय : हंसिका वाघ ( बाल शिक्षण मंदिर, गोरेराम लेन)
तृतीय : निशा जाधव ( वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल.)
उत्तेजनार्थ : ॠतिका जाधव (पुष्पावती रुंगठा कन्या विद्यालय), रेणुका मानकर (जनता विद्यालय, गोरेराम लेन), राशी किंगे (विद्या प्रबोधिनी प्रशाला)