Dindori Accident Case | पिंपळगाव बहुलातील विहीर मृत्यूचा सापळा

Dindori Accident Case | संरक्षक कठडे नसल्याने रात्री वाहने, पादचारी कोसळण्याची भीती
Well Repair Grant |
Well Repair Grant: विहीर दुरुस्तीसाठी 18 कोटींचे अनुदानFile Photo
Published on
Updated on

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बहुला गावात त्र्यंबक रोडलगत पुलाजवळ असलेली विनाकठड्याची विहीर पादचारी आणि वाहनचालकांसाठी धोकादायक ठरली आहे. या विहिरीभोवती कोणतीही सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे दिंडोरीसारखी दुर्घटना होण्याची भीती आहे.

Well Repair Grant |
Contractor Protest | राज्य सरकारला ठेकेदारांचा अल्टिमेटम! 96,500 कोटींची बिले थकल्याने 'कामबंद'चा इशारा

दिंडोरीत गत शुक्रवारी विहिरीत कार पडून एकाच कुटुंबातील नऊ जणांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाही प्रशासनाने अद्याप या धोकादायक विहिरींकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. पिंपळगाव बहुला येथील रस्त्यालगतची ही विहीर उघडी आणि असुरक्षित असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही विहीर पुलाजवळ आणि मुख्य रस्त्यालगत असल्याने लहान मुले, पादचारी तसेच वाहनधारकांसाठी धोकादायक आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था अपुरी असल्यामुळे त्यात वाहन पडून अपघाताची शक्यता आहे.

Well Repair Grant |
Dindori Accident Case| दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समिती नियुक्त

याबाबत अनेकदा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे यांनी सांगितले की, दिंडोरीसारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी पिंपळगाव बहुला येथील ही धोकादायक विहीर तत्काळ बुजविणे किंवा सुरक्षित करणे अत्यावश्यक आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news