Satpur Arogyavardhini Center | सातपूर आरोग्यवर्धिनी केंद्रांचे धक्कादायक वास्तव! डॉक्टरांअभावी नर्स अन् मदतनीसांच्या हाती कारभार

Satpur Arogyavardhini Center | सातपूर प्रभाग सभापतींच्या अचानक पाहणीत आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव
Satpur Arogyavardhini Center
Satpur Arogyavardhini Center
Published on: 
Updated on: 

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

सातपूर प्रभागातील चार आरोग्यवर्धिनी केंद्रांपैकी दोन केंद्रांमध्ये नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने नर्स आणि मदतनीसांच्या भरोशावर आरोग्यसेवा सुरू असल्याचे धक्कादायक चित्र प्रभाग सभापती समाधान देवरे यांच्या अचानक पाहणीदरम्यान समोर आले.
महापालिकेतर्फे शंभरहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे अर्थात आरोग्यवर्धिनी केंदे सुरू करण्यात आली आहेत.

Satpur Arogyavardhini Center
Water Pollution News | सातपूर प्रभाग समिती बैठकीत जोरदार राडा! अधिकारी सुस्तावले, नगरसेवक आक्रमक

सातपूर प्रभागातील समृद्धनगर, सावरकरनगर, विश्वासनगर आणि प्रबुद्धनगर येथे चार आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये डॉक्टर नियमित उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्रभाग सभापती देवरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी देवरे यांनी मंगळवारी दुपारी कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित केंद्रांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.

समृद्धनगर आरोग्यवर्धिनीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री भोसले या ऑगस्ट महिन्यापासून प्रसूती रजेवर आहेत. त्या फेब्रुवारीमध्ये पुन्हा सेवेत रुजू होणार असल्याची माहिती पाहणीदरम्यान देण्यात आली. त्यामुळे सध्या या केंद्रात नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले.

Satpur Arogyavardhini Center
SIR Campaign Election | 'एसआयआर सुरू आहे... 1 ऑगस्टनंतर या' सातपूर विभागीय कार्यालयात नागरिकांना हेलपाटे

सावरकरनगर आरोग्यवर्धिनीची परिस्थितीही वेगळी नाही. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मोरे यांच्याकडे आनंदवली आरोग्यवर्धिनीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आनंदवली येथील डॉ. अश्विनी जाधव प्रसूती रजेवर असल्याने डॉ. मोरे हे आठवड्यातील दोन दिवस आनंदवली येथे सेवा देत आहेत.

परिणामी, सावरकरनगर केंद्रातील वैद्यकीय सेवेलाही त्याचा परिणाम होत असल्याचे पाहणीत आढळले. विश्वासनगर आरोग्यवर्धिनीच्या वैद्यकीय अधिकारी डिसेंबरमध्ये प्रसूती रजेवर जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात या केंद्रातील वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

"अचानक केलेल्या पाहणीमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्रांत काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने नर्स व मदतनीसांच्या माध्यमातून कामकाज सुरू असल्याचे दिसून आले. याबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन रिक्त पदांवर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येणार आहे."

- समाधान देवरे, सातपूर प्रभाग सभापती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news