सप्तशृंग घाट उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी १२ दरम्यान बंद

सप्तशृंग गड घाटामध्ये सरक्षण जाळीचे काम सुरू आहे
Saptashrungi Ghat will be closed from 7 AM to 12 PM from tomorrow
सप्तशृंग घाट उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी १२ दरम्यान बंदFile Photo
Published on
Updated on

सप्तशृंग गड; पुढारी वृत्तसेवा

श्रीक्षेत्र गडावरील 10 कि. मी च्या घाटात पावसाळ्यात लहान मोठे दरड पडण्याच्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भाविक भक्तांच्या व ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दुष्टीने कोटी रुपये खर्च करून सप्तशृंग गड घाटामध्ये सरक्षण जाळीचे काम सुरू केले आहे. उद्या (सोमवार) पासून सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घाट रस्ता बंद राहणार असल्याचे पत्र सहाय्यक जिल्हाधिकारी अनुकुरी नरेश यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे.

तीन तारखेपासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. त्‍या निमित्‍त उपाययोजना करण्यासाठी तात्काळ घाट रस्त्यावरील अधांतरी असलेले दगड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भाविकांच्या व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व नागरिकांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी दिनांक 23- 9- 2024 ते ते 25- 9- 2024 या दरम्यान सप्तशृंगी गडावरील ते नांदुरी या दहा किलोमीटरचा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्‍याची माहिती माननीय जिल्हाधिकारी अनुकुरी नरेश यांनी सांगितले आहे.

सप्तशृंगी रस्त्यावर कायम लहान-मोठी दरड पडत असते. ग्रामस्‍थ आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जाळी संदर्भात कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत गेल्या पंधरा दिवसांपासून काम सुरू आहे. यासाठी पवई येथील कंपनी हे काम या ठिकाणी करीत आहे. येथील कामासाठी या पश्चिमबंगाल येथील कर्मचारी आहेत. 3 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील जाळी बसविण्याचे काम चालू आहे. यात्रेच्या दृष्‍टीने हे काम चालू असून, तीन दिवस काम चालु राहणार आहे. त्यानंतर सदरचे काम पंधरा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तरी या कालावधीत येणाऱ्या देवी भक्तांनी सकाळच्या वेळी न येता दुपारी दर्शनासाठी यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news