Saptashrungi Devi | सप्तशृंगी देवीच्या आभूषणांची आज मिरवणूक

Saptashrungi Devi Navratri festival | शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
Vani Saptashrungi Devi Temple
सप्तशृंगी देवीच्या आभूषणांची आज मिरवणूक file photo
Published on
Updated on

नांदुरी : आद्यस आदिमाया सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी (दि. ३) सुरुवात होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेची पंचामृत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद डी जगमलानी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पुर्वी पहाटे सहा वाजेच्या ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात देवीच्या आभूषणांचे पूजन ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांच्या हस्ते होणार आहे.

त्यांनतर या आभूषणांची ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून सवाद्य मिरवणूक निघणार आहे. हे आभूषणे सुरक्षितपणे मंदिरात नेण्यात येतील. यजमानांच्या प्रमुख उपस्थितीत पंचामृत महापूजा व आरती होईल. त्यानंतर श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे. यावेळी ट्रस्ट विश्वस्त ॲड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर उपस्थिती राहणार आहेत. भाविकांच्या निवास व्यवस्था नेहमी प्रमाणे कार्यान्वित असणार आहे. त्यासोबतच शिवालय परिसरात भाविकांसाठी वॉटर प्रूफ निवारा शेड उभारण्यात आला आहे. उत्सव कालावधीत भाविकांसाठी ट्रस्टमार्फत मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.मंदिर परिसर, डोम व ट्रस्टच्या इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशी माहिती ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news