Sant Nivruttinath Palkhi Prasthan | संत श्री निवृत्तिनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Sant Nivruttinath Palkhi Prasthan | मंत्री गिरीश महाजन, खा. राजाभाऊ वाजे, आ. गोकुळ गिते यांची उपस्थिती
Sant Nivruttinath Palkhi Prasthan | संत श्री निवृत्तिनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Published on
Updated on

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

टाळ-मृदंगाचा गजर... हरिनामाच्या अखंड जयघोषात आणि विठ्ठलनामाच्या भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहपूर्ण वातावरणात त्र्यंबकनगरीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

Sant Nivruttinath Palkhi Prasthan | संत श्री निवृत्तिनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
भिरवंडेचे श्री रामेश्वर मंदिर

शतकाची परंपरा लाभलेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने झाले. सोमवारी सकाळपासून संत श्री निवृत्तिनाथ मंदिर परिसरात पालखी सोहळ्याची तयारी सुरू होती. दुपारी १२ च्या सुमारास नारळ प्रसादाच्या कार्यक्रमानंतर पालखीचे मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, बाळासाहेब देहुकर यांच्यासह मानकरी उपस्थित होते.

संत श्री निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळाप्रमुख माधवदास राठी यांच्यासह विश्वस्त, पुजारी जयंत महाराज गोसावी यांची उपस्थिती होती. पालखी सोहळ्यासाठी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, खा. राजाभाऊ वाजे, आ. हिरामण खोसकर, आ. गोकुळ गिते यांची उपस्थिती लाभली.

याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी पालखी सोहळ्याला हजेरी लावून संत श्री निवृत्तिनाथांचे दर्शन घेतले. दुपारी ३ वाजता पालखी नाथांच्या संजीवन समाधी मंदिरापासून पुढे निघाली. भगव्या पताका, सजवलेले अश्व, नगाऱ्यांचा रथ असे डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनमनोहरी सोहळा भक्तांनी अनुभवला. रस्ते कामामुळे यंदा पालखी प्रस्थान मार्ग बंद करण्यात आला आहे. चौकी माथा तसेच तेली गल्ली या परिसरातून प्रथमच पालखी प्रस्थान झाल्याने येथील नागरिकांनी आनंदा व्यक्त केला. महिलांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून भक्तिभावाने पुष्पवृष्टी करत पालखीचे स्वागत केले.

अमित ठाकरे पायी दर्शनाला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी पालखी सोहळ्यात हजेरी लावून नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी ठाकरे यांनी गर्दीमुळे दूर अंतरावर वाहन थांबवून मनसैनिकांसमवेत मंदिराकडे पायी जात दर्शन घेतले.

Sant Nivruttinath Palkhi Prasthan | संत श्री निवृत्तिनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Ashadhi Wari Farmers: पेरणी पांडुरंगाच्या हाती सोपवून वारकरी पंढरीकडे; पेरणी की वारी, भयंकर पेच

कुशावर्तावर पादुकांची महापूजा

कुशावर्त तीर्थावर नाथांच्या पादुकांची महापूजा नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार-सोनवणे त्यांचे पती माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. येथे आरती होऊन नाथांचा पालखी रथ त्र्यंबकेश्वर मंदिराकडे आला. येथे त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्तांनी स्वागत केले. संत श्री निवृत्तिनाथ महाराज आणि भगवान त्र्यंबकराज यांची भेट झाली.

वारकरी भक्तांनी अभंग सेवा सादर केली. येथे भक्तांनी फुगड्या खेळळ्या. पालखीचा पहिला मुक्काम प्रस्थानापासून दोन किमी अंतरावर असलेल्या पेगलवाडी फाटा येथील महानिर्वाणी आखाड्यातील गहिनीनाथ महाराज समाधी स्थळावर आहे. येथे भाविकांच्या भोजनाची तसेच मुक्कामाची सुविधा करण्यात आली आहे. यावर्षी पालखीसोबत रुग्णवाहिका व आरोग्य पथकांची उपस्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news