

नांदगाव : नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचना कळवाडी गटात मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. दहिवळ येथे बैलगाडीतून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. 'भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव' करण्यासाठी समीर भुजबळ यांना विविध संस्था संघटनाकडून पाठींबा मिळत असून नांदगाव मतदारसंघात विकासाची शिट्टी वाजणार असा निर्धार मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे.
समीर भुजबळ यांनी सोमवारी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कळवाडी गटातील विविध गावांना भेटी दिल्या. यादरम्यान त्यांचे विविध ठिकाणी ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. तर दहिवळ येथे चक्क सजविलेल्या बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढत त्यांना खांद्यावर घेऊन नागरिकांनी पारंपारिक वाद्यांवर ठेका धरल्याचे बघावयास मिळाले. यावेळी निळया टोप्या, मफलर परिधान केलेले व निळे झेंडे हाती घेतलेले ग्रामस्थ रॅलीच्या अग्रभागी होते. यावेळी दिगंबर पवार, वैभव पवार, पुरुषोत्तम गांगुर्डे, सचिन पवार, गोकुळ पवार, सोमनाथ वाघ, श्रीकांत साळुंखे, भारत गांगुर्डे, ऋषिकेश पवार, बापू पवार, नितीन पवार, कैलास पवार यांच्यासहित मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
समीर भुजबळ यांना विविध संस्था संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. त्यांना मालनगाव येथील वीर एकलव्य ग्रुपच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला. येथील वीर एकलव्य ग्रुपचे ज्ञानेश्वर दळवी, दिनेश दळवी, काशिनाथ दळवी, चैत्राम दळवी, राजू दळवी, विजय दळवी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भुजबळ यांना पाठिंबा दिला. तसेच गिगाव येथील शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर जाधव यांनी समीर भुजबळ यांच्या गटात प्रवेश करीत त्यांना पाठिंबा दिला.