Sameer Bhujbal | समीर भुजबळ यांच्या प्रचार रॅलीने दुमदुमले मनमाड

कौल भुजबळ यांनाच असल्याची जोरदार चर्चा
Sameer Bhujbal
मनमाड : शहरात नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेली रॅली.Pudhari
Published on
Updated on

मनमाड : 'भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव' अशी घोषणा देऊन मैदानात उतरलेले अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ मनमाड शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. भुजबळ यांची निशाणी असलेल्या शिट्ट्यांच्या आवाजाने मनमाड परिसर दुमदुमला होता. तसेच, या भव्य रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या रॅलीमुळे मनमाडकरांचा कौल भुजबळ यांनाच असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला. समीर भुजबळ यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रॅली पुढे मार्गस्थ होऊन एकात्मता चौक, नुक्कड पान स्टॉल चौकातून पुढे आली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महालक्ष्मी चौकात लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. पुढे महालक्ष्मी चौक - तेली गल्ली - नीलमणी गणेश मंदिर येथे रॅली आली. गणेश मंदिरात भुजबळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर सराफ बाजार, सरदार पटेल रोडहून छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. इंडियन हायस्कूल रस्त्याने दादासाहेब गायकवाड चौक, बावन नंबर येथे रॅली पोहोचून क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तुफान चौक येथे रॅलीचा समारोप झाला.

या प्रचार रॅलीत दीपक गोगड, रवींद्र घोडेस्वार, दिलीप नरवडे, संजय निकम, संजय भालेराव, पी. आर. निळे, मानेकर बाबूजी, सुशील खरे, कैलास अहिरे, वंदेश गांगुर्डे, सचिन संसारे, तौफिक खान, नीलेश मानेकर, अमोल गांगुर्डे, दीपक धीवर, प्रमोद जगताप, विष्णू पवार, भागवत मोरे, रमेश भालेराव आदी सहभागी झाले होते.

ढोल-ताशांच्या तालावर ठेका

रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच समीर भुजबळ यांच्या पत्नी डॉ. शेफाली भुजबळ, योगिता पाटील, दीक्षा कडलक, अपर्णा देशमुख आदींनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला. समीर भुजबळ यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

आव्वाज भुजबळांचाच..!

मिरवणूक मार्गात ढोल-ताशा आणि झांझरियाच्या तालावर रंगत वाढत होती. त्याचवेळी बाजारातून जाणारे नागरिकही कौतुकाने "आव्वाज भुजबळांचाच" असे बोलत होते. प्रचार रॅलीत समीर भुजबळ यांनी निळी टोपी आणि निळी मफलर परिधान केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news