

Saiyami Kher from Nashik is 'Ironman'
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
थंड पाणी, बोचणारे वारे आणि आव्हानात्मक कठीण चढाई अशा अडथळ्यांवर मात करत मूळ नाशिककर असलेल्या सैयामी खेर हिने जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉन (हाफ ट्रायथलॉन) पूर्ण करत वर्षभरात दुसऱ्यांदा जबरदस्त कामगिरीचे दर्शन घडवले.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही सैयामीने आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेतला होता. वर्षाच्या आतच तिने दुसऱ्यांदा या स्पर्धेत भाग घेत विक्रमावर नाव कोरले. सैयामी खेरने ६ जुलै रोजी स्वीडनच्या जोनकोपिंग येथे पार पडलेल्या 'आयर्नमॅन २०२५' स्पर्धेत ही कामगिरी केली. ७०.३ ट्रायथलॉन अभिनेत्रीने यशस्वीरीत्या पूर्ण केली. या स्पर्धेत एका दिवसात १.९ किमी स्विमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ अर्धमॅरेथॉन धावायची असते. थंड पाणी, बोचरा वारा आणि कठीण चढाई अशी आव्हानं पार करत सैयामीनं स्पर्धा ३२ मिनिटं आधीच पूर्ण केली.
'आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉन ही जगभरातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धेपैकी एक आहे. त्यामध्ये सैयामीने खुल्या पाण्यात १.९ किमी पोहणे त्यानंतर ९० किमी सायकलिंग आणि अर्थमॅरेथॉन धावणे (२१.१ किमी) धावणे हे सर्व एकाच दिवसात आणि वेळेच्या ३२ मिनिटे आधी पूर्ण करत देशासह नाशिकच्याही शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.