

नाशिक : सहकार महर्षी स्वर्गीय भास्कर (आबा) कोठावदे यांच्या जयंतीनिमित्त रिमांड होम (मुला- मुलींचे बाल निरीक्षण गृह) नाशिक येथे कोठावदे परिवाराच्या वतीने निरीक्षणगृहात गृहउपयोगी असे किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी दै.भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा, केशव वाणी, विलास कोठावदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मालती कोठावदे, लक्ष्मीकांत कोठावदे, अविनाश कोठावदे, प्रकाश दिघे, साहेबराव पवार, शरद कर्डिले, अशोक वाणी, शुभाष येवला, के.के.चव्हाण, हितेश शहा, भालचंद्र नेरकर, निर्मला गांधी, शुभाष गांधी,प्रमोद बधान, राहुल बोरसे, सचिन पालकर आदी उपस्थित होते.