Rohit Pawar Press Conference | पार्थ आणि जय पवारांमध्ये फूट पाडण्याचे भाजपचे मोठे षडयंत्र; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप

Rohit Pawar Press Conference | खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Rohit Pawar News
Rohit Pawar NewsPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षावर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय सोयीसाठी भाजप 'चाणक्य नीती'चा वापर करून पार्थ पवार आणि जय पवार या दोन भावांमध्ये जाणीवपूर्वक द्वेष पसरविण्याचे कारस्थान रचत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar News
Simhastha Kumbh Mela | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांच्या निधीत घसघशीत वाढ; प्रत्येकी 7 कोटी मिळणार

सध्याचे राजकारण अत्यंत घाणेरडे आणि वंगळ झाले आहे, असा अजितदादांचा जुना इशारा आठवून देत, पार्थ आणि जय यांनी मुख्यमंत्र्यांच्या गोड शब्दांना न भुलता, पक्षातील ज्येष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाखाली सावध पावले उचालावीत, असा थेट सल्लाही रोहित पवारांनी दिला.
येथे बुधवारी (दि. ४) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार पवार बोलत होते.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय रणनीतीवर जोरदार निशाणा साधताना पवार म्हणाले की, भाजपच्या चाणक्य नीतीमध्ये 'अतृप्त आत्मां'चा वापर करून, घरातील वाद उफाळून आणण्याची जुनी पद्धत आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अंतर्गत खदखद आहे. दोघांचे अजिबात पटत नाही.

उद्या जर शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली, तर आपल्या हातात पूर्ण ताकदीने एक पक्ष असावा म्हणूनच दादांच्या पक्षाचा संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात घेण्यासाठी भाजप पार्थ आणि जय यांच्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी केली.

ज्यांच्या जीवावर आणि ज्यांच्यामुळे राज्यात सत्ता आली, ते अजितदादा कसे बाजूला गेले किंवा त्यांचे काय झाले, यावर हे नेते चकार शब्दही काढत नाहीत. त्यांना फक्त केंद्रात মন্ত্রिपद मिळवणे आणि अमित शाह यांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये रस असल्याचे पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे शब्द गोड वाटतील, पण सावध राहा

जय पवार यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा संदर्भ देत रोहित पवार म्हणाले की, जय नुकतेच मुख्यमंत्र्यांना भेटले. सध्या मुख्यमंत्र्यांचे शब्द ऐकायला खूप गोड वाटतील. पण, त्या गोडव्यामागे कटकारस्थान दडलेले असू शकते.

राजकारण किती वंगळ आणि क्रूर असते, हे स्वतः दादांनी वेळोवेळी सांगितले आहे. त्यामुळे पार्थ आणि जय या दोन्हीही षडयंत्र ओळखून पक्षातील प्रमुख व अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन घ्यावे, आपसात मांडू नये, असा इशारा रोहित पवारांनी यावेळी दिला.

Rohit Pawar News
Simhastha Kumbh Mela | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांच्या निधीत घसघशीत वाढ; प्रत्येकी 7 कोटी मिळणार

काही नेत्यांना महाराष्ट्राचे अर्थ खाते आपल्या पदरात पाडून घ्यायचे आहे, यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे सांगत त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे थेट नाव न घेता टोला लगावला. सध्या पक्षातील काही नेते पार्थ पवार आणि सुनेत्रा काकूंना पद्धतशीरपणे एकटे पाडत आहेत.

मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हेच आता पार्थ आणि काकूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मदत करत असल्याचाही पवार यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष छबू नागरे, निरीक्षक पंकज बोराडे, महिला शहराध्यक्ष अनिता दामले आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.