

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या 'युवा आणि ड्रिपेशन' अभ्यासानुसार ५१.८ टक्के तरुणाई उदासीनतेच्या आजारातून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगात भौतिकवादी जीवनशैलीची ओढ, जीवघेणी स्पर्धा, करिअरसाठी प्रचंड संघर्ष, पालकांच्या वाढत्या अपेक्षा आणि पाल्यांच्या खिशात अगदी कमी अयात खुळखुळणारा पैसा यामुळे आजची मुले प्रचंड ताणतणावात जीवन जगतात.
७१ टक्के : १७ ते २५ वयोगटांतील तरुणाईमध्ये चिता किंवा नैराश्य भावना.
६९ टक्के: १६ ते १८ पौगंडावस्थेत उदासीनता, नैराश्याची प्रकरणे.
५ टक्के : १२ ते १७ वयोगटांतील मुलंपिकी वर्षभरात मुलींमध्ये नैराश्य.
१६.८ टक्के : देशात गेल्या वर्षात १८ ते २४ वयोगटांतील तरुणाई नैराश्याची शिकार.
विनासायास वयातच मिळत जाणत्या सर्व सुख सुविधा, अपयश, नकार न पचवता येणे, भावनांचे तणावांचे व्यवस्थापन न जमणे यामुळे मुले उदासीनतेची शिकार होत असल्याचे मत समाजअभ्यासी, मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवले आहे. त्यावर उपाय म्हणून व्यायाम, निरोगी जीवनशैली यासह पालक-मुले सुसंवाद असेही उपाय समाजअध्यासींनी नोंदवले आहे. १६ ते ३५ वयोगटांतील तरुणाईमध्ये उदासीनतेच्या आजाराचे प्रमाण लक्षणीय आहे.
भौतिकवादी जीवनशैलीची अनिवार ओढ सामाजिक माध्यमे, पालकांशी तुटलेला संवाद, छोटी होत जागारी घरे, मुलांना गरजेपेक्षा अधिक मिळत जाणारा पैसा ही याची कारणे होय. कुठलीही गोष्ट विनासायास उपलब्ध होत असल्यामुळे मुलांना नकार, संघर्ष करण्याची मानसिकताच उरली नाही. विवेक शून्यतेने विचार करून मुले पटकन नैराश्यात जातात. यातून व्यसनाधीनता, हिंसक वर्तन, गुन्हेगारी आणि शेवटचे टोकाचे पाऊल जीवनप्रवास संपवणे अशा छोट्या कारणांसाठी म्हणजे तरुणाई जीवनाचा प्रवासच थांबवत आहेत.
चिडचिड होणे, थकवा जाणवणे, निरुपयोगी किंवा दोषी वाटणे, जीवन प्रवास थांबवण्याचा विचार येणे, निद्रानाश, अन्न खावेसे न वाटणे किंवा जास्त जेवणे, त्यांच्या छंदांमध्ये रस नसणे, वैयक्तिक स्वच्छतेत टाळाटाळ, मद्यपान, धुम्रपान किंवा अमली पदार्थ घेणे.
ध्यान, योग यासह मूल्याधिष्ठीत आध्यात्मिक दृष्टिकोन विकसित करणे, छोटी छोटी ध्येय निश्चित करणे, निसर्गात रमणे, लेखन, चित्र, संगीत, शिल्प, नृत्य यासारखे अभिनव, सर्जनशील छंद जोपासणे, एखाद्या जवळशा व्यक्तींशी मन मोकळे करणे, ज्याच्याशी संकोच न करता मनमोकळे बोलता येईल असे नातेसंबंध निर्माण करणे आणि त्यांच्याशी सुसंवाद साधणे.
गेली तीन दशकांमध्ये तरुणाईमध्ये नैराश्य आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या विळखा जीवघेणी स्पर्धा, अतिमहत्वाकांक्षा, भौतिक सुखाची अनिवार ओढ यामुळे तरुणाई डिप्रेशनमध्ये जात आहे. टीव्ही, काल्पनिक सिनेमा, रोचक पद्धतीचे साहित्य, अशास्त्रेक्त आशय, चित्रपट यामुळे युवापिढीत भ्रामक समजुती निर्माण होतात. सैरभैर युवा मग उदासीनतेचे शिकार होतात.
डॉ. महेश भिरुड, मानसरोग तज्ज्ञ, नाशिक.
डोपामाइन आणि सेरोटोनिन ही संप्रेरके व्यायामामुळे अधिक प्रमाणात निर्माण होतात ज्याद्वारे व्यक्तीमध्ये आनंद निर्माण होण्यासता मूड सुधारण्यास, नैराश्य कमी होण्यास मदत, पौष्टिक, सकस आहार, मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करते. अल्कोहोल आणि अमली, उतेजक पदार्थ, मनोरंजनात्मक (रिक्रएशनल ड्रग) औषधांमुळे हिंसात्मक विचार, अविवेक बावतो, त्यांच्या मूडवर नकारात्मक परिणाम होतो. तसेच सोशल मीडियाचा अतिरेकी वापरावर अंकुश मिळविण्यासाठी वापराचे वेळापत्रक ठरविणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांकडून समुपदेशन विचार व विश्वासांवर लक्ष केंद्रित करून भावना आणि वर्तनात सकारात्मक बदल घडवावा, मित्र, कुटुंच, आणि सामाजिक गटांशी संपर्कात राहावे. ध्यान व मननाचा सराव करावा, समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य तंत्र, भावनात्मक बुद्धिमत्ता वाढवून नैराश्यावर सहज मात शक्य आहे.
मृणाल भारव्दाज, युवा मानसशास्त्रज्ञ, नाशिक.