Nashik Sex Scandal | नाशिक हादरले! 121 अश्लील व्हिडिओ अन् बलात्काराचा आरोप; रवींद्र एरंडेला 2 दिवसांची पोलीस कोठडी

Nashik Sex Scandal | सातपूर परिसरातील सेक्स स्कैंडल प्रकरणातील प्रमुख संशयित रवींद्र गणपत एरंडे याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Suregaon Instagram video case
Suregaon Instagram video case(Pudhari Photo)
Published on
Updated on

नाशिक / सातपूर : पुढारी वृत्तसेवा

सातपूर परिसरातील सेक्स स्कैंडल प्रकरणातील प्रमुख संशयित रवींद्र गणपत एरंडे याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी रात्री अटक केल्यानंतर शनिवारी (दि.४) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 'मुलाला चांगली नोकरी लावून देतो, भविष्य उज्ज्वल करून देतो', असे आमिष दाखवत एरंडे याने एका महिलेला नाशिक व इगतपुरी परिसरातील विविध ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.

Suregaon Instagram video case
Eknath Khadse vs Girish Mahajan | तुम्ही रात्र कोणासोबत घालवली ते बघा!

या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांमध्ये एरंडे याचे विविध महिलांसोबतचे तब्बल १२१ अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत, ज्यामुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची सुरुवात खंडणीच्या तक्रारीपासून झाली होती. एरंडे याच्या कार्यालयातील ऑफिस बॉय आकाश बकरे याने हार्ड डिस्क चोरून त्यातील व्हिडिओंच्या आधारे एरंडेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता.

या तक्रारीनंतर सातपूर पोलिसांनी आकाश बकरे आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या टॅबमध्ये १२१ व्हिडिओ आढळून आले होते. तपासादरम्यान या व्हिडिओंमध्ये एरंडे याचेच अश्लील चित्रीकरण असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. पोलिसांनी नागरिकांना व संभाव्य पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर एका महिलेने एरंडेविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एरंडे याला अटक केली.

Suregaon Instagram video case
Nashik Ashok Kharat Case | खरातच्या साथीदारांना नोकरीतून काढणार! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा 'बडतर्फी'चा थेट इशारा

न्यायालयात या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी तपास अद्याप अपूर्ण असल्याचे सांगत पोलिस कोठडीची मागणी केली. व्हिडिओमधील महिलांची ओळख पटविणे, त्यांचे जबाब नोंदविणे, वैद्यकीय तपासणी, तसेच इतरत्र व्हिडिओ साठवले आहेत का याचा तपास करण्यासाठी कोठडीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

एरंडे यांचे वकील अरुण दोंदे यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद मांडताना सांगितले की, आरोपी दोन दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात असून, आवश्यक तपास आधीच करता आला असता, जप्त टॅबमधील व्हिडिओ उपलब्ध असल्याने नव्याने काही जप्त करण्याची गरज नाही.

तसेच फिर्यादीने २०२३ मधील घटनेचा उल्लेख केला असल्याने पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश पी. एन. पांढरे यांनी एरंडे याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ती अंशतः मान्य केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news