

नाशिक : येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर दि. १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र-सौराष्ट्र रणजी सामन्याचा तयारीचा आढावा मनपा आयुक्त व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षा मनीषा खत्री यांनी घेतला. मैदानाला प्रत्यक्ष भेट देत त्यांनी या सामन्याच्या आढावा घेतला.
आयुक्तांनी सामन्याची खेळपट्टी, पॅव्हेलियन हॉल, दोन्ही संघांच्या ड्रेसिंग रूम्स व मैदानातील इतर सोयी सुविधांची पाहणी करत समाधान व्यक्त केले तसेच रणजी ट्रॉफी सामन्यासाठी नाशिक मनपाचे संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी बीसीसीआयचे खेळपट्टी तज्ज्ञ क्यूरेटर टी. मोहनन यांच्याशी त्यांनी चर्चा केली. याप्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन धनपाल शाह, सेक्रेटरी समीर रकटे, खजिनदार हेमंत देशपांडे, संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व इतर पदाधिकारी डॉ. अनिरुद्ध भांडारकर, हेतल पटेल, प्रवीण घुले, राजू आहेर, फय्याज गंजीफ्रॉकवाला, शेखर घोष, रतन कुयटे, निखिल टिपरी आदी उपस्थित होते.