केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे file photo
नाशिक
Raksha Khadse | केंद्रीय राज्यमंत्री खडसे आज नाशिकमध्ये
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे श्रावण सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर
नाशिक : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज सोमवारी (दि. १२) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर येथे त्या पूजा करणार आहेत.
मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा खडसे नाशिकमध्ये येत असल्याने भाजपकडून त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. राज्यमंत्री खडसे यांचे दुपारी १ वाजता त्र्यंबकेश्वर येथे आगमन होणार आहे. यावेळी त्या मंदिरात पूजन करणार आहेत. त्यानंतर तीन वाजता नाशिक शहरात त्यांचे आगमन होईल. सायंकाळी सहा ते रात्री ८ या कालावधीत त्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी त्या संवाद साधणार आहेत. खडसे या मंत्री झाल्यानंतर प्रथमच नाशिकमध्ये येत असल्याने पक्ष कार्यकर्ते तसेच त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे.

