Rajmata-Gaumata: तस्करी, गोहत्येविरोधात व्हावे कठोर कायदे

देशी गाईला राज्यमातेचा दर्जा : निर्णयाचे स्वागत गो-पालकांकडून अपेक्षा
cow protection
गायीला राज्यमाता दर्जा pudhari news network
Published on
Updated on
नाशिक : निल कुलकर्णी

देशी गाईला 'राज्यमाता- गोमाता' घोषित करण्याच्या शासन निर्णयाचे गो-पालकांसह समाजाच्या सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. पण हा निर्णय कागदावरच न राहता, एकही गोवंश कत्तलखान्यात जायला नको. कचरापेटीवर कचरा खाताना दिसयाला नको यासह गोवंश तत्करी, गो- हत्येसंदर्भात कडक कायदे करून त्यांची अमलबजावणी व्हावी तसेच गोहत्या अजामिनपात्र गुन्हा ठरावा अशी अपेक्षा, गोरक्षक तसेच गोशाळा संस्थापकांनी व्यक्त केली.

प्राचीन काळापासून मानवी जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना 'कामधेनू' असे संबोधले जाते. राज्यात वेगवेगळ्या भागात देवणी, लालकंधारी, खिल्लार, डांगी गवळाऊ अशा देशी गाई आढळतात. विविध कारणांनी देशी गायींच्या संख्येत होणारी घट या बाबी चिंताजनक आहेत. यापार्श्वभूमीवर पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषणासाठी प्रेरित करण्यासाठी देशी गायीस 'राज्यमाता- गोमाता' घोषित करण्याचा निर्णय स्वागतहार्य मानला जात आहे.

शासनाचा निर्णय स्तुत्य असून त्याचे स्वागत करतो. यामुळे गोशाळांना निधीही उपलब्ध होणार आहे. गोमातेच आर्शीवाद अन् पूण्याचे ते भागीदार आहेत. गोशाळांना खूप अधिक फायदा होणार आहे.

नेमीचंद पाेद्दार, अध्यक्ष, नंदिनी गोशाळा नाशिक.

आता कुठेही गाईंंची हत्या होऊ नये, तीने रस्त्यांवरचा कचरा, प्लास्टिचे खाऊ नये किंबहुणा कुठेही बेवारस दिसता काम नये यासाठी प्रयत्नाची गरज आहे. हा निर्णय कागदोपत्री नसावा. गोपालन हे एकट्याचे काम नसून तीचे संगोपन, संरक्षण ही सामुहिक जवाबदारी असावी.

पुरुषोत्तम आव्हाड, संस्थापक, मंगलरुप गोशाळा, नाशिक.

गोमाता कसाईच्या हाती लागू नये, शेतकऱ्यांना गोवंश विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. गो- तस्कारी पूर्ण थांबावी. गोहत्येबाबत कडक कायदे करावेत. गोरक्षकांना संरक्षण देण्याची गरज आहे.

रुपाली जोशी, सचिव, मंगलरुप गोशाळा, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news