

ठळक मुद्दे
यार्ड रीमॉडेलिंगमुळे रविवारी रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल
भुसावल–इगतपुरी दरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गास दौंड–मनमाड यार्डाशी जोडणी
मनमाड स्थानक व यार्डात प्री-नॉन इंटरलॉकिंग तसेच नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक्स घेण्यात येणार
नाशिकरोड: भुसावळ–इगतपुरी दरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गास दौंड–मनमाड यार्डाशी जोडणी करण्यासाठी यार्ड रीमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी मनमाड स्थानक व यार्डात प्री-नॉन इंटरलॉकिंग तसेच नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक्स घेण्यात येणार आहे. त्यामुळे विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक्सचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे भुसावळ–देवळाली एक्सप्रेससह अनेक गाड्या उशिराने सुटणार आहे.
ब्लॉक्समुळे दि. ७ सप्टेंबर (रविवार) रोजी अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून काही गाड्या वळविण्यात येतील. काही शॉर्ट टर्मिनेट, तर काही उशिराने सुटतील. या पायाभूत सुविधा विकासासाठी करण्यात येणाऱ्या ब्लॉक्सदरम्यान होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मुंबई–साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस कल्याण, लोणावळा, पुणे, दौंडमार्गे
साईनगर शिर्डी–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस दौंड, पुणे, लोणावळा, कल्याणमार्गे
निजामाबाद–पुणे एक्सप्रेस पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड, दौंडमार्गे
रामेश्वरम–ओखा एक्सप्रेस पूर्णा, हिंगोली, अकोला, भुसावळ, जळगावमार्गे
नांदेड–अमृतसर एक्सप्रेस पूर्णा, हिंगोली, अकोला, भुसावळमार्गे
मुंबई–नांदेड एक्सप्रेस कल्याण, कर्जत, पुणे, दौंड, लातूर, परळी, परभणी, पूर्णामार्गे
नांदेड–मुंबई एक्सप्रेस पूर्णा, परभणी, परळी, लातूर, दौंड, पुणे, कर्जत, कल्याण मार्गे
नगरसोलला हिंगोली–मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
औरंगाबादला धर्माबाद–मनमाड एक्सप्रेस
नगरसोलला काचीगुडा–मनमाड अजंता एक्सप्रेस
नगरसोल येथून मुंबई–हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस
औरंगाबाद येथून मनमाड–धर्माबाद एक्सप्रेस
नगरसोल येथून मनमाड–काचीगुडा अजंता एक्सप्रेस
साईनगर शिर्डी–पुरी एक्सप्रेस: ६ तास
साईनगर शिर्डी–काकीनाडा एक्सप्रेस: ३ तास
लोकमान्य टिळक टर्मिनस–सुलतानपूर एक्सप्रेस: १ तास
पुणे–राणी कमलापती हमसफर एक्सप्रेस: दीड तास
लोकमान्य टिळक टर्मिनस–माँ बेल्हा देवी धाम एक्सप्रेस: १ तास
भुसावळ–देवळाली एक्सप्रेस: १ तास उशिराने सुटेल.