Railway Diwali Gift : रेल्वेला ऑक्टोबरमध्ये 138.72 कोटींचा महसूल

भूसावळ विभागाची जोरदार कामगिरी, फुकट्या प्रवाशांना दहा कोटींचा दंड
देवळाली कॅम्प (नाशिक)
देवळाली कॅम्प (नाशिक) : भुसावळ विभागाने चालू ऑक्टोबर महिन्यात विविध स्त्रोतांमधून उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

देवळाली कॅम्प (नाशिक) : भुसावळ विभागाने चालू ऑक्टोबर महिन्यात विविध स्त्रोतांमधून उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. या कालावधीत विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 138.72 कोटींचे महसूल मिळवला असून तो ऑक्टोबर 2024 च्या तुलनेत 15 टक्के अधिक आहे.

विनातिकीट, अनियमित तिकीट तसेच बिनपावतीसह माल वाहून नेणाऱ्या एकूण 1,08,940 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करताना विभागाने त्यांच्याकडून 9.94 कोटी रुपये दंड वसूल केला. प्रशासनाने निर्धारित लक्ष्यापेक्षा 92 टक्के अधिक महसूल मिळविला आहे.

ऑक्टोबरमधील महसूल (रुपये)

  • प्रवासी उत्पन्न: 78.10 कोटी

  • इतर कोचिंग उत्पन्न: 8.30 कोटी

  • मालवाहतूक उत्पन्न: 52.32 कोटी

  • विविध उत्पन्न: 2.15 कोटी

अशी आहे लक्षणीय कामगिरी

  • दिवाळी व छठपूजा सणानिमित्त प्रवासी संख्येत झालेल्या मोठ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागात प्रवासी व्यवस्थापनासाठी सर्वांगीण गर्दी नियंत्रण व्यवस्था प्रभावीरीत्या अंमलात आणण्यात आली.

  • रेल मदत कार्यप्रदर्शन – ऑक्टोबर 2025 साठी :तक्रार निराकरणाच्या सरासरी वेळेसंदर्भात भुसावळ विभागाने भारतीय रेल्वेमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

  • मूर्तिजापूर स्थानकावर नूतन प्रवासी लिफ्टचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मूर्तिजापूर स्थानकावरील प्रवासी सुविधा आणि सोयी-सुविधांमध्ये आणखी भर पडली आहे.

  • प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाइल अनारक्षित तिकीट प्रणाली विभागातील नाशिक, मनमाड, जळगांव, भुसावळ, अकोला, शेगाव आणि खंडवा या 07 स्थानकांवर कार्यान्वित करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण 3,245 अनारक्षित तिकिटांची नोंद झाली आहे.

  • कांद्याच्या 22.5 रेक्सची लोडिंग क्षमता साध्य केली असून त्यामुळे सुमारे 9.5 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 1000 टक्के वाढ साध्य करण्यात यश आले आहे.

  • ऑक्टोबर महिन्यात तिकीट तपासणीमधून 9.94 कोटींचा महसूल प्राप्त झाला असून, या कालावधीचे लक्ष्य 5.18 कोटी रुपये होते. त्याच्या तुलनेत कामगिरी 215 टक्क्यांनी अधिक राहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news