

देवळाली कॅम्प (नाशिक) : मध्य रेल्वे मुंबई - नांदेड दरम्यान उन्हाळी विशेष गाड्यांच्या २४ सेवा चालवणार आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंत एकूण ३५६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्यांखेरीज या गाड्या आहेत. मुंबई एलटीटी - नांदेड उन्हाळी विशेष गाड्यांच्या २४ अतिरिक्त सेवांचा तपशील – एलटीटी मुंबई- हुजूर साहेब नांदेड ही साप्ताहिक विशेष ट्रेन (०११०५) ९ एप्रिल ते २५ जूनपर्यंत दर बुधवारी एलटीटी मुंबईहून ००.५५ वाजता सुटेल आणि नांदेड येथे त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११०६ ही साप्ताहिक विशेष ट्रेन ९ एप्रिल ते २५ जूनपर्यंत दर बुधवारी नांदेड येथून २०.०० वाजता सुटेल आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी १४.४५ वाजता पोहोचेल. या गाड्यात एक प्रथम वातानुकूलित, एक व्दितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ सामान्य व्दितीय श्रेणी, १ सामान्य व्दितीय श्रेणी असे डबे राहणार आहेत. तसेच या विविध गाड्यांना ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा असे थांबे आहेत.