

नाशिक : आरएसएस आणि भाजपची विचारधारा ही महिलांना कायम दुय्यम स्थान देणारी आहे. याउलट काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांचा सन्मान करत त्यांना मुख्य प्रवाहात स्थान दिले आहे. भाजपची हीच महिलाविरोधी मानसिकता आणि काँग्रेसची जनहितैषी विचारधारा घराघरांत पोहोचवा, असा थेट आदेश लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी योनी दिला.
एसआयआरचे प्रश्न, जेन इझीसोबत संवाद वाढवण्याचा आणि शेती, उद्योग, आदिवासी, बेरोजगारीची कारणमिमांसा जाणून घेऊन प्रत्येकाने थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा मूलमंत्र देत पक्षसंघटना अधिक बळकट करण्याचे आवाहन काँग्रेसच्या संघटन सूजन या प्रशिक्षण शिबिरात लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना केले, पक्षासोबत एकनिष्ठ कसे रहावे, याचा कानमंत्रही राहुल गांधी यावेळी दिला.
कॉंग्रेसच्या संघटन सूजन अभियान अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे दहादिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा बुधवारी (दि.२) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने समारोप झाला. पहिल्या सत्रात देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी केंद्राच्या धोरणांवर कडक शब्दांत टीका केली. भारत, अमेरिका आणि चीन यांच्यातील केवळ मध्यस्थ बनून राहिला आहे.
देशात स्थानिक उत्पादन घटल्यामुळे बेरोजगारीची समस्या प्रचंड गंभीर झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजप सरकार महिलांना सन्मान देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सांगत त्यांनी ऐतिहासिक दाखले दिले. संघाची विचारधारा आपण कधीही स्वीकारणार नाही, असा पुनरुच्चार केला. काँग्रेसची दृष्टी व दिशा, पक्षासमोरील आव्हाने, संघटनात्मक तयारी, काँग्रेसची विचारधारा आणि देशाच्या राजकारणातील पक्षाची भूमिका यावर शिबिरात चर्चा झाली.
राष्ट्रीय व राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांनी शिबिराधौता मार्गदर्शन केले. नव्या पिढीतील कार्यकत्र्याच्या मनातील प्रश्न, अपेक्षा, मुद्दे आणि राजकीय दृष्टिकोन यांनाही या प्रशिक्षणात विशेष महत्त्व देण्यात आले. शिबिरापूर्वी राहुल गांधी यांचे जिल्हाध्यक्ष भारत टाफेकर, रमेश कहांडोळे, शहराध्यक्ष नीलेश खैरे, राजाराम पानगव्हाणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आरएसएसची पायरी चढता कामा नये
शिबिरात राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांशी संवाद साधांना पक्ष आणि आरएसएसची विचारधारा समजावून सांगितली. या विचारधारेशी काहींनी जुळवून घेतले. मात्र, आपण कधीही त्यांच्याशी जुळवून घेणार नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना आपली विचारधारा निश्चित करा, त्या विचारांवर ठाम राहून काम करा. आरएसएसची पायरी चढता कामा नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जेन झी शी थेट संवादाचा फॉर्म्युला
पक्षसंघटन तळागाळात पोहोचवण्यासाठी राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना कृती आराखडा दिला. महाराष्ट्रातील 'एमआयआर' चे प्रश्न, तरुणपिढी म्हणजेच 'जेन झी'सोबत वाढवायचा संवाद, तसेच शेती, उद्योग, आदिवासी विकास आणि बेरोजगारीच्या मुळाशी जाऊन काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पक्षाशी पूर्ण एकनिष्ठ राहा, स्वतःचे कुटुंब सांभाळतानाच समाजातील मागासवर्गीय, गरीब, शेतकरी आणि मजुरांच्या प्रश्नांशी आपुलकीने ओहले जा, असा कानमंत्र देत या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सदैव कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार होण्याचे स्वप्न बाळगा
काग्रेसच्या चहादिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणे आणि ते पूर्ण करणे हे आगामी निवडणुकांतील उमेदवारीसाठी महत्वाचे ठरणार असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले. शिबिर पूर्ण करणाऱ्या जिल्हाध्यक्षांना पुढील काळात निवडणुकीत प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे शिबिर पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जपून ठेवा, असे स्पष्ट आवाहन गांधी यांनी केले. शिचिरात उपस्थित किमान ३० जण पुढील काळात आमदार होतील. त्यामुळे आतापासून कामाला लागा. तुम्हाला आमदार व्हायचे आहे की केवळ व्हिजिटिंग कार्डवर जिल्हाध्यक्ष लिहायचे आहे, हे तुम्हीच ठरवा, असा थेट प्रश्न गांधी यांनी केलं.