Rahud Ghat Accident | राहुड घाटात भीषण अपघात! ब्रेक निकामी झालेला टोमॅटोचा ट्रक कारला धडकून उलटला

Rahud Ghat Accident | चांदवडच्या राहुड घाटात भीषण अपघात; नाणीज संस्थानच्या रुग्णवाहिकेने जखमींना मदत
Accident
AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मुंबई - आग्रा महामार्गावरील राहुड घाटात बुधवारी (दि. २५) मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले.

Accident
Chandwad Crime News | चांदवड शहरात मंडप साहित्य चोरीच्या वादातून धारदार शस्त्रांनी व्यावसायिकाचा निर्घृण खून

त्यानंतर ट्रकने समोरून जाणाऱ्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटून दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त ट्रक (जेके१४-एफ ४४८७)मध्ये टोमॅटो भरलेले होते. ट्रक उलटल्याने त्यातील टोमॅटो रस्त्यावर आणि परिसरात विखुरले. त्यामुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कार (एमएच ०४-एलबि ६९७९)चेही या धडकेत नुकसान झाले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज यांच्या मोफत रुग्णवाहिकेने जखमींना तत्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात अफजल मोहाजित पोसवाल आणि मताज हेमल (दोघेही रा. काश्मीर) हे जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.