

नाशिक : हनी ट्रॅप प्रकरणी मुख्यमंत्री स्वत: लक्ष ठेवून आहेत, हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी कोणीही थांबवलेली नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचे मत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
उल्हास वैतरणा नदीजोड प्रकल्प कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जलसंपदामंत्री मंत्री विखे-पाटील सिंचन भवन येथे रविवारी (दि.3) आले असता आव्हाड, पाणी, हनी ट्रॅप, संजय शिरसाठ, खडसे, रोहित पवार आदी विविध मुद्यांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, निळवंडे धरणाला विखे-पाटलांचा विरोध आहे हे सांगण्यासाठी महाराष्ट्रातील एका नेत्याने धरणाचे तीनदा भूमिपूजन केले. राजकारणामुळेच धरणाचे काम 35 ते 40 वर्षे लांबले, मात्र त्याचे उद्घाटन करण्याची जबाबदारी महायुती सरकारवर आली. पंतप्रधान मोदींनी निळवंडे धरणाचे उद्घाटन केले यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे. रोहित पवार यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, रोहित यांच्याकडे कोणतेही काम नाही, लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. लोकांची कामे करण्यावर लक्ष द्यायला हवे. संजय शिरसाठ प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता पाळण्याबाबत त्यांना बजावल्याचे सांगितले. तसेच खडसे प्रकरणी त्यांच्या जावयाला अडकवल्याचा आरोप खरा नसल्याचे सांगितले. दरम्यान, निळवंडे धरणाचे पाणी मुंबईला जाणार असून, त्याचा फायदा होईल. मात्र, सरकारने पाणी वापरकर्त्यांवर बंधन घालायला हवे. काही ठिकाणी उन्हाळ्यात पाणीही मिळत नाही. स्थानिकांना प्राधान्य हवे असे सांगितले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विरोधक टीका करत होते. मात्र, त्यांचा डाव फसला आहे. आता राजकारणात काही मुद्दा उरलेला नसल्याने पृथ्वीराज चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड हे बिनबुडाचे आरोप करीत आहेत, खरेतर सनातनमुळेच धर्म टिकून आहे हे विरोधकांनी समजून घ्यायला हवे, अशा स्पष्ट शब्दांत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
माणिकराव कोकाटे माझे चांगले मित्र आहेत, नाशिककरांना त्यांचा स्वभाव ठाऊक आहे, त्यांच्या मनात काहीही नाही, बाहेरचे लोक त्यांच्या स्वभावाला समजून न घेता टीका करतात, असे म्हणत त्यांनी कोकाटेंची पाठराखण