पुढारी विशेष! कृत्रिम बुद्धिमत्ता संकट नव्हे, तर संधीच!

नोकऱ्यां जाण्याची भीती निरर्थक; अल्पावधीतच नागरिक आत्मसात करतील ज्ञान
कृत्रिम बुद्धिमत्ता
कृत्रिम बुद्धिमत्ताimage source - X
Published on
Updated on
नाशिक : निल कुलकर्णी

येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) विलक्षण स्थित्यंतरे घडणार आहेत. यामुळे अनेक सर्जनशील कल्पना, बहुविध पर्याय उपलब्धता, जलद, प्रभावी आणि तत्काळ उपलब्ध होणाऱ्या सेवा, उत्पादकता, नावीन्यता उपलब्ध होणार आहेत. यामुळे रोजगारावर कुऱ्हाड येणार अशी भीती निराधार असून, कुणीही 'पॅनिक' होण्याची गरज नाही. 'एआय' हे संकट नसून ती सुवर्णसंधी आहे. ती 'कॅश' करणाऱ्यांसाठी विकासाची कवाडे उघडणार असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिले.

Summary
  • 'एआय'चा नैतिकतेने वापर करणे ठरणार आव्हान

  • ललित, दृश्यकलेमध्ये बहरणार सौंदर्य, सर्जन

  • प्रारंभी विरोध नंतर स्वीकारार्हता हे 'एआय'ला होईल लागू

१९८९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात संगणकाचे आगमन भारतात झाले. तेव्हाही नव्या तंत्रज्ञानाला असाच विरोध झाला होता. त्यावेळी १०० लोकांचे काम एकटा संगणक करणार असल्याने देशातील अर्ध्याहून अधिक लोकांच्या नोकऱ्या जातील, बेरोजगारी वाढेल अशी भीती व्यक्त झाली होती. त्याच वर्षी इंटरनेटची सेवाही सुरू झाली. १९९५- ९६ मध्ये घरोघरी संगणकासह इंटरनेटचे जाळे पसरले. मात्र, संगणकाबद्दलची भीती, गैरसमज, अफवा हे निराधार ठरण्यास वेळ लागला नाही. अगदी हीच परिस्थिती आज 'एआय'बाबत आहे. 'एआय' तंत्रज्ञानाने संपूर्ण मानवी उत्पादकता वाढीस लागेल आणि अल्पावधीत नागरिक हे तंत्रज्ञान आत्मसात करतील असा आशावादही तज्ज्ञांनी व्यक्त केला.

'एआय' हे वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, हवामान, वाहन उद्योग, संगणक यांसह अनेक क्षेत्रांमध्ये प्रभावी ठरणार आहे. मात्र, मानवी बुद्धिमत्तेपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता दरवेळी वरचढ आणि सरस ठरेल असेही होी. बदलणारे तंत्रज्ञान दुधारी असते, ते विकसाकडे नेणारे होऊ शकते. मानव उत्कर्षासाठी त्याचा उपयोग करून घेणे हीच खरी 'प्रज्ञा' ठरणार आहे.

प्रा. सचिन काकडे, संभाजीनगर

'एआय'मुळे रोजगार हिरावले जातील ही भीतीच निराधारच. नव्वदच्या दशकात काहीच लोकांना संगणक येत होता. आज ८० टक्क्यांहून अधिक नागरिक सेलफोन, संगणक सहज हाताळत आहेत. 'एआय'ने ललित कलेला नवा आयाम मिळणार आहे. 'एआय'साक्षर पिढी काळाची गरज ठरणार आहे.

प्रा. डॉ. मिलिंद ढोबळे, अधिष्ठाता, एमआयटी 'सोफा' पुणे.

'एआय' मानवी क्षमता, उत्पादकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरु शकते. नागरिकांच्या चुकीच्या धारणा, अज्ञान किंवा अर्धवट ज्ञान यामुळे नव्या तंत्रज्ञानाला प्रारंभी विरोध होणे आणि नंतर ते सर्वमान्य, स्वीकारार्ह होणे ही आपल्या देशात नवीन गोष्ट नाही. हे संकट नव्हे, तर संधी आहे.

प्रा. डॉ. अतुल पाटील, के. के. वाघ अभियांत्रिकी कॉलेज, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news