nashik news | ‘पुढारी सहकार महापरिषदे’चा नाशिकमध्ये होणार १८ एप्रिलला जागर

राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे
nashik news
nashik news
Published on
Updated on

नाशिक : सहकार क्षेत्रातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी ‘पुढारी’ माध्यम समूहातर्फे शनिवारी (दि. १८) नाशिकमध्ये सहकार महापरिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

‘पुढारी’ माध्यम समूहातर्फे नेहमीच शैक्षणिक, कृषी, क्रीडा आणि महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्रम राबवले जातात. याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी या एकदिवसीय महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या सहकार चळवळीला दिशा देणाऱ्या या महापरिषदेत सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, नाशिक विभागाचे सहनिबंधक संभाजी निकम, जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी, नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील ढिकले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. परिषदेसाठी रिसिल डॉट इनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पठाडे व नम्रता ॲडव्हर्टायझिंगचे संचालक मच्छिंद्र देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

सहकारी संस्थांसमोरिल वाढत्या अडचणी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी ही परिषद मैलाचा दगड ठरणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सहकारी संस्थांच्या उत्पन्नाचे नवे स्रोत, बँकिंग क्षेत्रातील डिजिटायझेशन आणि त्यातील संधी, सहकारी कायदे, लेखापरीक्षण (ऑडिट) आणि तांत्रिक बाबी, पतसंस्थांचे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि भविष्यातील उपाययोजना आदी विषयांवर विचार मंथन होणार आहे.

येथे होणार परिषद

शनिवारी (दि. १८) मुंबई-आग्रा रोडवरील इंदिरानगर सिटी गार्डन जॉगिंग पार्कसमोर हॉटेल एनराइस (सयाजी) येथे सकाळी १० ते सायं. ६ या वेळात परिषद होईल.

उत्स्फूर्त सहभाग

जिल्ह्यातील नामवंत सहकारी पतसंस्थांनी या परिषदेसाठी आपला सहभाग नोंदवला आहे. प्रत्येक संस्थेतून तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांना या विचारमंथनात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ज्या पतसंस्था प्रतिनिधींनी सहभाग घ्यायचा त्यांनी शहरासाठी महेश अमृतकर (९८६०७९८९८४) तर ग्रामीणांसाठी मधुकर देवरे (९०११०२३९५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news