President Medal 2025 : विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक

दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक
विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे
विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पोलिस दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलिसांना केंद्रीय गृह विभागाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली असून, नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. राज्यात केवळ चारच अधिकाऱ्यांना हा बहुमान मिळाला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलिस, अग्निशम सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील जवानांना शौर्य, सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील चार पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, तर ३९ जवनांना गुणवत्तापूर्ण सेवा पदके जाहीर झाली आहेत. त्यामध्ये नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, यापूर्वी नाशिकमध्ये पोलिस आयुक्त म्हणून काम केलेले रवींद्र सिंगल यांना हे पदक जाहीर झाले होते. दरम्यान, सांगलीतील महापालिका शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या दत्तात्रय कराळे यांनी, साताऱ्यातील सैनिक स्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी मिळवली. चंद्रपूरमधील नक्षलग्रस्त भागातून त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. तसेच युनोमध्ये युगोस्लाव्हिया, कोसोवा येथे आंतरराष्ट्रीय पोलिस अधिकारी म्हणून काम केले. ते मुंबईमध्ये सहा वर्षे पोलिस उपायुक्त होते. तसेच नाशिक शहर, कल्याण, ठाणे, धाराशिव याठिकाणी त्यांनी पोलिस उपायुक्त तसेच पोलिस अधीक्षक म्हणून सेवा बजावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दहशतवादविरोधी पथक, पूर्व प्रादेशिक अधिकारी, पोलिस सहआयुक्त म्हणूनही त्यांनी सेवा दिली आहे. २०१३ मध्ये त्यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाले होते. तसेच युनो शांती, आंतरराष्ट्रीय सेवा पदक, विशेष सेवा पदक, पोलिस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news