Chandwad Manmad Road | "चांदवड-मनमाड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात; मनमाडच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू"

Chandwad Manmad Road | खड्डा चुकवताना मनमाडच्या दोघांचा मृत्यू ...दिवसागणिक घेताहेत जीव..!
Chandwad Manmad Road
Chandwad Manmad Road
Published on
Updated on

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

चांदवड तालुक्यातील शिंगवे गावच्या शिवारातील चांदवड-मनमाड मार्गावर रस्त्यातील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात मनमाड येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव स्विफ्ट कार खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रस्त्यालगतच्या नाल्यात उलटली. या दुर्घटनेमुळे मनमाड शहरावर शोककळा पसरली असून, चांदवड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Chandwad Manmad Road
Goa Tribal Vision 2037: "'गोवा ट्रायबल व्हिजन 2037' हा विकासाचा नवा मार्गदर्शक आराखडा!; मंत्री रमेश तवडकर यांचा पुढाकार"

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड येथील शफिक गफूर शेख (४५, रा. कसाई मोहल्ला) व सागर वसंत बेदाडे (४०, रा. बुधलवाडी) हे बुधवारी (दि. २९) रात्री चांदवडकडून मनमाडकडे कार (एमएच १९, सीयू ९०७२) ने जात होते.

शिंगवे शिवारात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यांचा अंदाज चालकाला न आल्याने कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या खाली असलेल्या नाल्यात उलटली. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

Chandwad Manmad Road
Tarun Tejpal Case | "तरुण तेजपाल लैंगिक अत्याचार प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; गोवा खंडपीठाने निकाल ठेवला राखीव"

या दुर्घटनेत शफिक शेख व सागर बेदाडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

या भीषण अपघातानंतर चांदवड-मनमाड मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news