Nashik Simhastha Flag Hoisting | ढिसाळ नियोजन आणि भोंगळ कारभारामुळे नाशिक सिंहस्थ धर्मध्वजारोहण सोहळ्याचा उडाला फज्जा

Nashik Simhastha Flag Hoisting | ऐनवेळी मुख्य पुष्पफलक हटवण्याची वेळ; आसनव्यवस्थेत बदल
Nashik Simhastha Flag Hoisting | ढिसाळ नियोजन आणि भोंगळ कारभारामुळे नाशिक सिंहस्थ धर्मध्वजारोहण सोहळ्याचा उडाला फज्जा
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभाच्या ऐतिहासिक धर्मध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी केल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी शनिवारी (दि. ३१) प्रत्यक्ष सोहळ्यावेळी उघड झाल्या.

Nashik Simhastha Flag Hoisting | ढिसाळ नियोजन आणि भोंगळ कारभारामुळे नाशिक सिंहस्थ धर्मध्वजारोहण सोहळ्याचा उडाला फज्जा
President Droupadi Murmu | सायरनचा गजर आणि व्हीव्हीआयपी ताफ्यांमुळे नाशिक कुंभनगरीला आले हायप्रोफाइल छावणीचे स्वरूप

रामतीर्थ परिसरात उभारलेल्या मुख्य पुष्पफलकावरील अक्षरे गळून पडल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनाच्या काही मिनिटे आधीच हा फलक हटवण्याची वेळ आयोजकांवर आली. तर दुसरीकडे, ऐनवेळी नगरसेवकांच्या राखीव आसनव्यवस्थेत बदल केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.

त्यामुळे ऐतिहासिक सोहळ्याच्या उत्साhावर नियोजनातील गोंधळाने विरजन पडले. रामतीर्थावरील मुख्य ध्वजारोहण स्थळी आकर्षक पुष्पफलक उभारला होता. मात्र, त्यावरील अक्षरे गळून पडल्याने सोहळ्याला काही मिनिटे शिल्लक असताना हा फलक काढून त्या जागी भगवे ध्वज लावले. ऐनवेळच्या बदलामुळे आयोजकांची धावपळ उडाली.

नागरिकांची कोंडी

सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक निबंध लागू केले होते. मात्र, या व्यवस्थेमुळे परिसरातील स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घराबाहेर पडण्यास तसेच परिसरातून बाहेर जाण्यास नागरिकांना अडथळे आले.

वारंवार विनंती करूनही मार्ग मोकळा न झाल्याने नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला. एकीकडे भव्य सोहळ्याचे नियोजन आणि गर्दी व्यवस्थापनाचे दावे होत असताना दुसरीकडे स्थानिकांची झालेली गैरसोय प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली.

Nashik Simhastha Flag Hoisting | ढिसाळ नियोजन आणि भोंगळ कारभारामुळे नाशिक सिंहस्थ धर्मध्वजारोहण सोहळ्याचा उडाला फज्जा
Nashik Zilla Parishad | नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा; प्रशासकराज संपुष्टात येण्याची चिन्हे

संगीत पथकाचा सूर दमला

गोदावरी तीरावरील धर्मध्वजारोहण सोहळ्यात मंगलमय वातावरणनिर्मितीसाठी संगीत पथकाकडून गेल्या आठवडाभरापासून सराव करण्यात येत होता. शहनाई, तबला, संबळ आदी पारंपरिक वाद्यांच्या वादनासाठी स्वतंत्र मंचही उभारला होता. मात्र, प्रत्यक्ष सोहळ्यवेळी या पथकासाठी साऊंड सिस्टिमची व्यवस्था नसल्याने त्यांच्या वादनाचा सूर भाविकांपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यातच भर उन्हात वादन करणाऱ्या कलाकारांची झालेली परवड आणि प्रशासनाची अनास्था यामुळे उपस्थित नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.