

नाशिक : महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त (पोलिस रेझींग डे) शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने 3 ते 5 जानेवारीदरम्यान सीटी सेंटर मॉल येथे पोलिस दलातील विविध विभागांची माहिती नागरिक व मुलांना देण्याकरीता प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि.4) सायंकाळी 6:30 वाजता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनादरम्यान मुलांना बिनतारी संदेश (वायरलेस वॉकीटॉकी) यंत्रणेची माहिती देण्यात येणार असून, सदर यंत्रणा मुलांना हातळण्याकरीता देखील देण्यात येणार आहे.
यावेळी पोलिस बॅण्ड पथक, बिनतारी संदेश विभाग, डायल 112 यंत्रणा, शहर वाहतुक विभाग, बॉम्ब शोधक व नाशक पथक, डॉग स्कॉड, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, महिला सुरक्षा विभाग, दामिनी पथक, मोटार परिवहन विभागाकडील वज्र वाहन आदीबाबतची माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.