

Mangal Prabhat Lodha on Plumber New Designation
नाशिक : राज्यातील मजुरांना सन्मान मिळावा, यासाठी त्यांच्या काही नावात बदल केली जाणार आहेत. त्यानुसार प्लंबरचा दर्जा बदलणार असून प्लंबरचा आता वॉटर इंजिनियर म्हणून उल्लेख केला जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज (दि.३०) पत्रकारांशी बोलताना दिली.
भारतात मजुरांचा सन्मान होत नाही. त्यामुळे त्यांचा सन्मान वाढवावा, यासाठी आम्ही मजुरांच्या कामाच्या नावांत काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. काही जुनी नावे आहेत, त्यामध्ये काही बदल केले जातील. याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेऊन त्यामध्ये बदल केला जाईल. त्यामुळे मजुरांची समाजात प्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल, असे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.