Nashik Teachers Constituency
आमदार किशोर दराडे व मुख्यमंत्री यांच्यात फोनवर संवादPudhari Photo

Nashik | साहेब, तुमचा शब्द खरा केला; उबाठा गटाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर

आमदार किशोर दराडे व मुख्यमंत्री यांच्यात फोनवर संवाद
Published on

नाशिक : विजय घोषित झाल्यानंतर शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या भ्रमणध्वनीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देताना शिंदे यांनी, हा विजय सर्व शिक्षक व शिवसैनिकांचा तसेच शिक्षकांसाठी झटणाऱ्या लोकप्रतिनिधीचा असल्याचे नमूद केले.

शिक्षकांनी दराडे यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेत आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवून आपले प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा प्रतिनिधी दिला आहे. आ. दराडे यांचे मनापासून अभिनंदन. शिक्षकांनी आपल्या मागण्या शासन दरबारी मांडाव्या आणि त्यासाठी भांडावे. परंतु, आता आपल्याला भांडण्याची वेळ येणार नाही. कारण हे आपलं सरकार आहे. सरकारच्या माध्यमातून मागण्या पूर्ण केल्या जातील. शिक्षकांचे प्रश्न आ. दराडे यांनी आपल्या सरकारच्या काळामध्ये सोडवण्याचा विशेषत्वाने प्रयत्न केला आहे. यापुढेही शिक्षकांची प्रश्न सोडवण्यासाठी आपले शासन निश्चितपणे प्राधान्य देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

साहेब, तुमचा शब्द खरा केला

मतमोजणीबाबत माहिती देताना आमदार दराडे यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना, 'साहेब, मी तुमचा शब्द खरा केला आहे. उबाठा गटाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. मविआचा मोठ्या मताधिक्याने आपण पराभव केला आहे. आपला पाठिंबा आणि शिक्षकांच्या साथीने हे शक्य झाले.' असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news