Pay Max Global Scam | पे-मॅक्सच्या मालकाला नाशिकमधून बेड्या

Pay Max Global Scam | गुंतवणुकीवर १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा पे-मॅक्स ग्लोबल कंपनीचा मालक आणि मुख्य सूत्रधाराला आर्थिक गुन्हे शाखेने नाशिकमधून बेड्या ठोकल्या.
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा

गुंतवणुकीवर १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा पे-मॅक्स ग्लोबल कंपनीचा मालक आणि मुख्य सूत्रधाराला आर्थिक गुन्हे शाखेने नाशिकमधून बेड्या ठोकल्या. ज्ञानेश्वर त्र्यंबक दरगुडे (४७, रा. नाशिक) असे या भामट्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला २५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

Arrest
Nashik MLC Election | शिंदे शिवसेना-भाजपत रस्सीखेच

दरगुडे आणि टोळीने आतापर्यंत ५० हून अधिक नागरिकांची ३ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात यापूर्वी गुरुप्रसाद चव्हाण त्याची पत्नी सुपर्णा (रा. वसई-विरार, ठाणे), सुधाकर खंडागळे, विठ्ठल तांदळे, सोनी मनचंदानी (वसई विरार) यांना अटक करण्यात आली होती. सध्या खंडागळे, तांदळे, मनचंदानी हे हर्सल कारागृहात आहेत. या साखळीतील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर दरगुडे फरार होता. अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला नाशिकमधून शिताफीने अटक केली.

Arrest
Nashik Water Scarcity | जिल्ह्यात 347 गावांना 118 टँकरने पाणीपुरवठा

दुबई, मॉरिशसचे स्वप्न अन् १२ वी पास मास्टरमाइंड

ज्ञानेश्वर दरगुडे हा अवघा इयत्ता १२ वी पास आहे. मात्र, त्याने गेल्या सहा वर्षांपासून थेट दुबईत ऑफिस थाटून लोकांना गुंतवणुकीच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढले. यापूर्वी अटक करण्यात आलेला गुरुप्रसाद चव्हाण आणि त्याची पत्नी सुपर्णा यांनी संभाजीनगरातील जळगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये सेमिनार घेत ही कंपनी इंटरनॅशनल असल्याचे भासविले होते.

१० ते १२ वेगवेगळ्या फर्मच्या खात्यांत पैसे भरण्यास सांगून गुंतवणूकदारांना दुबई, मॉरिशसची स्वप्ने दाखविण्यात आली होती. गुरुप्रसादला १ मे रोजी पालघरमधील आलिशान बंगल्यातून अटक करण्यात आली होती. तर स्वतःच्या खात्यात पैसे घेऊन सेमिनारमध्ये आमिष दाखविणाऱ्या सोनी मनचंदानी हिलाही ५ मे रोजी बेड्या ठोकण्यात आल्या होत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news