Operation Lotus | ऑपरेशन लाेटस ; पवार गटाचे कानावर हात

राज्यात राजकीय भूकंपाचा अंदाज; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
Operation Lotus
शरद पवार, देवेंद्र फडणवीसfile
Published on
Updated on

नाशिक : महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपने 'ऑपरेशन लाेटस' हाती घेतले आहे. भाजपकडून शरद पवार गटाला सुरूंग लावत खासदार फोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राज्य पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर असताना पवार गटाने यासंदर्भात कानावर हात ठेवले असल्याने भाजपच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

एप्रिल- मे महिन्यात पार पडलेल्या लाेकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. युतीचे केवळ १७ खासदार संसदेत पोहोचले. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने अपयश धुऊन काढत जोरदार मुसंडी मारली. राज्यात तब्बल २३४ जागांवर महायुतीने विजय संपादन केला. त्यामुळे उत्साह दुणावलेल्या भाजपने आता ऑपरेशन लोटस हाती घेतल्याचे समजते आहे. त्यामध्ये शरद पवार गटाचे राज्यातील आठपैकी पाच खासदार फोडण्याची तयारी भाजपने केली आहे. या माध्यमातून पवार गटाच्या गडालाच सुरूंग लावला जाणार आहे. त्यामुळे २०२२नंतर पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप घडणार आहे.

भाजपने २०२२मध्ये ऑपरेशन लोटसअंतर्गत सर्वप्रथम शिवसेनेतील ५६ पैकी ४० आमदार फोडले. सुरत- गुवाहाटी- गोवामार्गे हे आमदार महाराष्ट्रात परतले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करत भाजपने २०१९चा बदला पूर्ण केला. त्यानंतर वर्षभरातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडले. त्यामुळे कधीकाळी एकत्रित असलेली शिवसेना व राष्ट्रवादी सध्या दुंभगले आहेत. मात्र, त्यापुढे जाऊन भाजपने पुन्हा एकदा राज्यात लोटस ऑपरेशनची तयारी केली आहे. यावेळी भाजप शरद पवार गटाला हादरा देणार आहे. त्यादृष्टीने भाजपांतर्गत हालचाली सुरू असल्याची चर्चा होत आहे. पण, त्याचवेळी पवार गटाकडून असे काही ऑपरेशन राबविले जातेय का? असल्यास आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसाँत ऑपरेशन लोटस राबविले गेल्यास जनतेने त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नये.

भाजपच्या ऑपरेशन लोटसबाबतची चर्चा निरर्थक आहे. पक्षाचे राज्यातील सर्व खासदार हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही खा. शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत.

- प्रा. भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news