सिन्नर : शहरातील विजयनगर भागात नवीन कोर्टासमोर बारागावपिंप्री रस्त्यालगत नगर परिषदेचे पाणीपुरवठा करण्याचे चेंबरवर झाकण बसवून तो खड्डा बंदिस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्यामसुंदर झळके यांनी मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्याकडे केली.
नगर परिषदेच्या या चेंबरमधून कॉलनीत पाणी सोडले जाते. मात्र, सदर चेंबरवर झाकण (ढापा) नसल्यामुळे अपघाताचा व दूषित पाणीपुरवठ्याचा धोका निर्माण झाला आहे.
उपाययोजनेची मागणी
चेंबर उघडे असल्याने त्यात हवेने आजूबाजूचा केरकचरा, घाण साचते. पावसाळ्यात खड्ड्यात गाळ साचून पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते. रस्त्यावर नेहमी वर्दळ असल्याने एखादी व्यक्ती अथवा लहान मुले त्यात पडून अपघात होण्याचा धोका आहे. दरम्यान, चेंबरजवळच युनियन बँक असल्याने ग्राहकांचा नेहमी राबता असतो.