Teachers Online Attendance | शिक्षकांची उपस्थिती ऑनलाइन अनिवार्य

Teachers Online Attendance | आजपासून 'स्मार्ट उपस्थिती' 'बॉट'द्वारे नोंद; मुख्याध्यापांवर जबाबदारी
Teacher Online Attendance
Teacher Online AttendancePudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवणे अनिवार्य केले आहे. शिक्षण आयुक्तलय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले असून, १५ ऑक्टोबर २०२६ पासून 'स्विफ्टचॅट' ॲपमधील 'स्मार्ट उपस्थिती' 'बॉट'द्वारे शिक्षकांची उपस्थिती नोंदवण्याच्या कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

Teacher Online Attendance
Drought Declared Nashik | नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड तालुके अधिकृतपणे दुष्काळी घोषित

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी डिजिटल स्वाक्षरीने हे निर्देश जारी केले आहेत. राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राच्या ६४ फ्रेमवर्कअंतर्गत विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीचे रिअल-टाइम डॅशबोर्डद्वारे संनियंत्रण करणार आहे. समग्र शिक्षा, पीएम पोषण, स्टार्स आणि पी.एम. श्री यांसारख्या योजनांच्या अंमलबजावणीवरही या यंत्रणेद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.

शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती नोंदवण्याची जबाबदारी मुख्याध्यापांवर सोपवली आहे. मुख्याध्यापक अनुपस्थित असल्यास प्रभारी मुख्याध्यापाकांनी ही नोंद करणे बंधनकारक आहे. शाळा शालार्थ पोर्टलवर नोंदणीकृत असल्यास संबंधित मुख्याध्यापाकांनी स्विफ्टचॅट ॲपमध्ये उपस्थिती नोंदवताना शाळेचा यू-डायस कोड आणि स्वतःचा शालार्थ आयडी वापरावा. तसेच शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Teacher Online Attendance
Sambhajinagar Accident | नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रक - दुचाकीची धडक; केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानासह तरूण जागीच ठार

शालार्थ पोर्टलवर नोंदणी नसलेल्या शाळांमधील मुख्याध्यापाकांनी यू-डायस प्लस पोर्टलवरील १० अंकी नॅशनल टीचर कोड आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा वापर करावा. उपस्थिती नोंदवताना तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित पोर्टलवरील माहिती अपडेट करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

वेळापत्रकानुसार नोंद

दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांमध्ये सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत, तर अन्य शाळांमध्ये सकाळी १० ते सायंकापी ५ या कालावधीत उपस्थिती नोंदवण्याचे निर्देश आहेत. रात्री ९ पर्यंत उपस्थिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. शिक्षणाधिकारी आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेचा नियमित आढावा घ्यावा. शिक्षकांच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद होत नसल्यास संबंधित शाळांना सूचना देऊन कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद आहे.

ऑनलाइन उपस्थिती नोंदवताना येणाऱ्या अडचणींसाठी विभागाने दिलेल्या लिंकवर तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीवर नियमित देखरेख ठेवणे आणि शैक्षणिक कामकाजात पारदर्शकता आणणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news