Nashik Lasalgaon | कांदा रेल्वे वाहतूक भाड्यात 29 टक्के कपात

Nashik Lasalgaon | केंद्र सरकारचा दिलासा; शेतकऱ्यांपर्यंत फायदा पोहोचवण्याची मागणी
Onion News
Onion News Pudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक / लासलगाव : देशातील कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांसाठी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने कांदा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बीसीएन आणि बीसीएनएफ मालवाहतूक वॅगन्सची अनुमत वहनक्षमता ४५ टन निश्चित केली आहे. या निर्णयामुळे कांद्याच्या रेल्वे वाहतूक भाड्यात सुमारे २९ टक्क्यांपर्यंत मोठी कपात होणार आहे.

Onion News
Nashik ZP to NASA | जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार 'नासा' दौर्याची सुवर्णसंधी; 'नाशिक ते नासा' उपक्रमांतर्गत मोठी घोषणा

राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले असून, या बचतीचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या खरेदी दरात दिसावा, अशी भूमिका मांडली आहे.
रेल्वे बोर्डाच्या कॉरिजेन्डम क्र. १५५ नुसार, सुधारित दर दि. २८ ऑक्टोबर २०२६ पासून एका वर्षासाठी लागू झाले आहेत. यापूर्वी या वॅगन्सची क्षमता अनुक्रमे ५९.८ ते ६१.४ टन आणि ६२.४ ते ६४ टन धरली जात होती. आता ती ४५ टन (अधिक १ टन अतिरिक्त भार सहनशीलता) केल्यामुळे वाहतूक खर्च थेट कमी होणार आहे.

Onion News
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी तब्बल 1618 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीला मिळणार मुहूर्त

कांदा हा नाशवंत माल असल्यामुळे किफायतशीर रेल्वे वाहतुकीने रस्त्यावरील अवलंबित्व घटेल आणि बंदरांपर्यंत माल पोहोचवणे सोपे होऊन भारतीय कांद्याची जागतिक स्पर्धात्मकता वाढेल. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले की, केवळ व्यापारी किंवा निर्यातदारांचा खर्च कमी होणे पुरेसे नसून, या भाडेकपातीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ शेतातील कांदा उत्पादकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.