

वावी (नाशिक) : समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील मर्हळ शिवारात (चॅनल क्र. 552) शुक्रवारी (दि.1) पहाटे पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात क्लीनर जागीच ठार तर चालक गंभीर जखमी झाला.
फिरोज बादशहा तांबोळी (32, रा. मुंगी, पैठण) असे मृताचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे मालवाहतूक करणारी पिकअप (एमएच 16, सीडी 7039) मर्हळ शिवाराजवळ आली असता, चालक शाहरुख पठाण (24, रा. खेड, पैठण) याला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव जाणारी पिकअप रस्त्यालगतच्या लोखंडी संरक्षक पॅनलला धडकली. या धडकेत वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या दुर्घटनेत क्लीनर फिरोज तांबोळी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने दोडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत वावी पोलीस ठाण्याचे हवालदार अनिल गोडे पुढील तपास करत आहेत.