

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या रष्टीने नाशिका महापालिकेने सारडा सर्कल ते वडाळा नाका परिसरात राबवलेल्या जोरदार अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत ५० हुन अधिक दुकानांवर जेसीबीचा हातोडा पडला. रस्त्यालगतची अतिक्रमित दुकाने, अनधिकृत बांधकामे, शेडसह काही घरेही या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली.
शनिवारी भल्यापहाते सुरू झालेल्या या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईदरम्यान मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आल्याने अनुचित प्रकार घडला नाही. मनपाच्या या कारवाईत ५० हुन अधिक दुकाने आणि बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यात हार्डवेअर स्लायडिंग विडो ग्लास, चिकन विक्रेते, गैरज, सर्व्हिस स्टेशन, कीमेकर, टायर तसेच रिक्षात बनवणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश होता.
बारवाईदरम्यान रफिक छोटूमिया शेख यांचे राहते घर पाडण्यात आले. ही कारवाई मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या आदेशानुसार अतिक्रमण उपआयुक्त सुवर्ण दखणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी विभागीय अधिकारी चंदन घुगे, विभागीय अधिकारी हेमंत झुटे.
विनायक जाधव तसेच अतिक्रमण विभागाचे प्रवीण बागूल, जीवन ठाकरे, गुणवंत वाम, स्वप्निल भांगरे, विनायक जाधव सहभागी झाले होते. पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
नोटीसविना कारवाई बेकायदा
मनपाच्या या कारवाईवर दुकानदारांकडून संशय व्यक्त करण्यात आला आहे. मनपाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवताना कोणत्याही प्रकारची मार्किंग करून दिलेली नव्हती. फुटपाथपासून पाच ते सात फुटांपर्यंत अतिक्रमण हटवले जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, रहता फुटपाथचे क्षेत्र सोडून ४५ ते ५० फूट आतपर्यंतचे सर्वच बांधकामे या कारवाईत हटवली गेली, काही घरेही या कारवाईत तोडली गेली. कोणतीही अधिकृत नोटीस न देता हुकूमशाही पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप रजा चिकन सेंटरचे समीर खान यांनी केला.
रात्रीतून दुकाने झाली रिकामी
कारवाईच्या एक दिवस आधी, महणजे ८ मेच्या सायंकाळी अतिक्रमण हटवण्याची तोंडी सूचना परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांना देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी रात्री उशिरापर्यंत आपल्या दुकानांतील साहित्य हलवण्यास सुरुवात केली होती. मित्र परिवाराच्या मदतीने पिकअप आणि मोठ्या ट्रकमधून सामान स्थलांतरित करण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ सुरू होती. कारवाईनंतरही अनेक व्यापारी पडलेले साहित्य कामगारांच्या मदतीने वाहनांमध्ये भरताना दिसून आले.
परिसराला छावणीचे स्वरूप
जुने नाशिक हा अतिसंवेदनशील परिसर मानला जात असल्याने प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली होती. १०० ते १५० पोलिस कर्मचारी, ८ ते १० पोलिस कॉन तसेच मनपाचे पथक परिसरात तैनात करण्यात आले होते. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कारवाईदरम्यान लागली आग
अतिक्रमण निर्मूलन कारवाईत जेसीबीमुळे होणारे नुकसान यळण्यासाठी काही अतिक्रामित व्यावसायिकांनी स्वतः च गॅस कटरच्या साहाव्याने दुकानांचे शेड काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, दुपारच्या तीव्र उष्णतेमुळे एका दुकानाला किरकोळ आग लागल्याची घटना घडली. मात्र ही आग तातडीने नियंत्रणात आणली गेली,