Nashik October Heat | 1 ऑक्टोबरपासूनच 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! नाशिकसह राज्यात तापमान 4 अंशांनी वाढणार

Nashik October Heat | तापमानवाढीचे संकेत : कमाल तापमान सरासरीपेक्षा चार अंशांनी वाढण्याचा अंदाज
October Heat
October Heat
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होत असतानाच, नाशिकसह महाराष्ट्राच्या तापमानात वाढ होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यातील अनेक भागांत कमाल तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना पुढच्या काही दिवसांत तीव्र उन्हाच्या चटक्याला सामोरे जावे लागू शकते.

October Heat
Kalika Mata Yatra | नाशिक कालिकामाता नवरात्र उत्सव: रहाटपाळण्याच्या जागेचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात!

यंदा राज्यात दुष्काळाची स्थिती असून, राज्यातील जवळपास सर्वच भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी बरसला आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्येच नाशिककरांना ऑक्टोबरच्या हीटचा सामना करावा लागला. दरम्यान, १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान पावसाचा कोणताही इशारा नसल्याने, ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून प्रखर हीटचा सामना करावा लागणार आहे.

पावसाचा प्रभाव ओसरत गेल्यास आकाश मुख्यतः निरभ्र राहून दिवसा उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रासह राजस्थान आणि वायव्य भारतातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचे संकेत आहेत.

काही भागांत हे तापमान सरासरीपेक्षा सुमारे दोन ते चार अंश सेल्सिअस अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये सप्टेंबरच्या उत्तरार्धातच कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यात पावसाचा प्रभाव कमी होऊन आकाश निरभ्र राहिल्यास दुपारी उन्हाचा चटका आणखी जाणवू शकतो. 'आयएमडी'च्या शहरी हवामान सेवेत २९ सप्टेंबर रोजी नाशिकचे तापमान ३० अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ५८ टक्के नोंदली गेली होती.

October Heat
Adivasi Gen Z Long March | नाशिक ते मुंबई 'उलगुलान लाँग मार्च' सुरू! पोलिसांची धरपकड अन् बॅरिकेट्स तोडून 'आदिवासी जेन झी' आक्रमक

मान्सूनची माघार, उष्णतेचा प्रभाव

महाराष्ट्रातून मान्सूनचा प्रभाव पूर्णपणे कमी होत गेल्यानंतर वातावरणातील ढगाळपणा कमी होऊन सूर्यप्रकाश वाढतो. त्याचा थेट परिणाम कमाल तापमानावर होतो. सध्याच्या हवामान स्थितीत मध्य महाराष्ट्रासाठी १ ऑक्टोबरनंतर काही दिवस पावसाचा इशारा नसल्याचे 'आयएमडी'च्या उपभागनिहाय इशाऱ्यात नमूद आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पावसाळी वातावरणानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच वातावरणात झपाट्याने बदल जाणवू शकतो.

रात्रीही उकाडा कायम:

दिवसा वाढणाऱ्या तापमानाबरोबरच रात्रीचे किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये रात्रीचे तापमान १९ ते २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिल्यास रात्रीच्या वेळीही गारवा अपेक्षिततका जाणवणार नाही. विशेषतः ऑक्टोबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेनंतर रात्रीची उष्णताही जाणवण्याची शक्यता आहे. दिवसाचे कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान दोन्ही वाढल्यास नागरिकांना दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. घरांमध्येही रात्री उष्णता साचून राहिल्याने झोपेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news