Nashik News | आता बेशिस्त वाहनचालकांना बसणार ई-चलनाचा दंड

Nashik News | आता बेशिस्त वाहनचालकांना बसणार ई-चलनाचा दंड

नाशिक : शहरात ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत असून त्यात वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने स्वयंचलित नियंत्रण यंत्रणेची (सिग्नल) संख्या वाढविण्यात आली आहे. परंतु त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्याऐवजी वाहनचालकांचा बेशिस्त दिवसागणिक वाढत आहे.

नाशिक सिटीमध्ये कित्येक सिग्नलवर फेरीवाले आणि भिकाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. रिक्षाचालकांची मुजोरी, स्वयंचलित वाहतूक यंत्रणेला आवाहन देणारी वाहनचालकांची अरेरावी, यामुळे शहरात वाहतूक पोलीस आहेत की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासना कडून अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण दिले जात असले तरी लवकरच बेशिस्त वाहनचालकांवर इ-चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

सह्याद्री रुग्णालयाजवळ असलेल्या सिग्नलची. काठे गल्ली, मुंबई नाका, द्वारका तसेच इंदिरानगरकडे ये-जा करणाऱ्यांची वर्दळ या ठिकाणी असते. परंतु, या ठिकाणीही वाहतूक यंत्रणा सुरू आहे की नाही, अशी स्थिती दिसून येते.

शहरातील मुख्य रस्ता असलेल्या नाशिक- त्र्यंबक रस्त्यावरील जलतरण तलावाजवळील सिग्नल, नाशिक-सातपूर रस्त्यावरील हॉटेल सिबल, पेठरोडवरील कृषी बाजार समिती, खडकाळी, राऊ हॉटेल, अशा काही ठिकाणी असलेल्या सिग्नलची दुरवस्था, वाहनचालकांचा बेमूर्वतपणा, हा वाहतूक पोलिसांना आवाहन देणारा ठरत आहे. वाहनचालकांची मुजोरी वाढत असतांना अनेक सिग्नलवर भिकारी, फेरीवाले यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.

शहरातील वाहतूक विभागातील काही पोलीस हे पाथर्डी फाटा, इंदिरानगर बोगदा, एबीबी सर्कल, नाशिकरोड यासह अन्य गर्दीच्या ठिकाणी नेमण्यात आले आहेत. अन्य सिग्नलवर स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे वाहनचालकांना ई-चलनाद्वारे दंड होईल. तसेच स्मार्ट सिटीकडे ६० वॉर्डन मागितले आहे. ही नियुक्ती झाल्यासह अन्य ठिकाणी हे मनुष्यबळ वापरता येईल.

चंद्रकांत खांडवी (पोलीस उपआयुक्त)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news