North Maharashtra Politics : शिंदे सेनेची आज उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकFile Photo
नाशिक
North Maharashtra Politics : शिंदे सेनेची आज उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक
शिवसेने (शिंदे गटा) ची उत्तर महाराष्ट्र स्तरीय आढावा बैठक
नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपपाठोपाठ आता शिवसेने (शिंदे गटा) ची उत्तर महाराष्ट्र स्तरीय आढावा बैठक बुधवारी(दि.१५) मुंबईत होत आहे.
शिवसेना नेते रामदास कदम, खासदार श्रीकांत शिंदे, सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या आढावा बैठकीला शिंदे गटाचे मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.
भाजपने गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. त्यानंतर शिंदे गटानेही भाजपपाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक मुंबईतल्या शिवसेना कार्यालयात बोलविली आली आहे.

