NMRDA | राज्यशासनाच्या 'एनएमआरडीए'वर नाशिकमधील हे पाचही आमदार नियुक्त

NMRDA Nashik | एनएमआरडीएवर शहरातील पाचही आमदारांची वर्णी
NMRDA Nashik
एनएमआरडीए - नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर शहरातील पाचही आमदारांची वर्णी लावली आहे. pudhri news network
Published on
Updated on

नाशिक : महापालिका हद्दीलगतच्या ३० किलोमीटर पर्यंतच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एनएमआरडीएवर राज्य शासनाने शहरातील चारही आमदारांची वर्णी लावली आहे. ग्रामीण भागातून विधान परिषदेचे आमदार किशोर दराडे यांना संधी मिळाली असून, त्यांचीही सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (The state government has nominated all the five MLAs of Nashik city from Nashik Metropolitan Region Development Authority i.e. NMRDA)

२००८ मध्ये नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) स्थापना करण्यात आली. २०१४ मध्ये या प्राधिकरणावर शासनाने आठ सदस्यांची नियुक्ती घोषित केली होती. आता नव्याने पुढील पाच वर्षांकरिता लोकनियुक्त सदस्यपदावर शहरातील चारही आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रा. देवयानी फरांदे, नाशिक पश्चिम मतदारसंघातील आमदार सीमा हिरे, नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले तसेच देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे सदस्य किशोर दराडे हेदेखील पाचवे सदस्य म्हणून प्राधिकरणावर राहतील. नाशिक महापालिका हद्दीपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावरील प्रदेशाचा विकास करण्याची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. त्यासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यालय नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय इमारतीत कार्यरत आहे. मनीषा खत्री या प्राधिकरणाच्या आयुक्त आहेत.

प्राधिकरणाकडे ६७ कोटी रुपयांचा निधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील कांदा-बटाटा भवनजवळ महापालिकेने प्राधिकरण कार्यालयासाठी नवीन जागा उपलब्ध करून दिली आहे. प्राधिकरण क्षेत्रातील अर्थात महापालिका हद्दीपासून ३० किलोमीटर क्षेत्राच्या आत असलेल्या घोटी, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, त्र्यंबकेश्वर परिसराचा विकास करण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. प्राधिकरणाकडे सद्यस्थितीत ६७ कोटी रुपयांचा निधी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news