NMC Spark Award 2024 | नाशिक मनपाला केंद्राचा 'स्पार्क' पुरस्कार प्रदान

नाशिक महापालिका सन्मानित! राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत उत्कृष्ठ कार्यासाठी गौरव
The Nashik Municipal Corporation (NMC)
नाशिक : नवी दिल्लीतील सोहळ्यात केंद्र सरकारचा 'स्पार्क' पुरस्कार स्वीकारताना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे. Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या अंमलबजावणीत उत्कष्ठ कार्य केल्याबद्दल केंद्रीय गृह निर्माण व शहर विकास मंत्रालयातर्फे नाशिक महापालिकेला गुरूवारी(दि.१८) 'स्पार्क २०२४' पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीतील विशेष सोहळ्यात केंद्रीय गृह निर्माण व शहर विकास मंत्री मनोहर लाल, केंद्रीय गृह निर्माण व शहरी राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. The Nashik Municipal Corporation (NMC)

Summary

नाशिक महानगरपालिकेला दीनदयाळ अंत्योदय योजना-नॅशनल अर्बन लिव्हलीहुड मिशन (Deendayal Antyodaya Yojana-National Urban Livelihoods Missions (DAY-NULM)) अंतर्गत नागरी संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल (Union ministry of housing and urban affairs) केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून स्पार्क पुरस्कार 2024 (सिस्टमॅटिक रिअल टाइम रँकिंग) प्राप्त झाला आहे.

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या देशातील ३३ महापालिका, नगरपालिकांना या सोहळ्यात गौरविण्यात आले. दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकांच्या गटात तिसऱ्या क्रमांकवर असलेल्या नाशिक महापालिकेला यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोहळ्यास महापालिकेचे उपायुक्त अजित निकत, एनयुएलएमच्या शहर अभियान व्यवस्थापक पल्लवी वक्ते व रंजना शिंदे उपस्थित होते.

The Nashik Municipal Corporation (NMC)
नाशिक महापालिकेस केंद्राचे दोन पुरस्कार; नवी दिल्लीत उद्या पुरस्कार वितरण सोहळा

एनयुएलएम (Deendayal Antyodaya Yojana-National Urban Livelihoods Missions (DAY-NULM)) अभियानांतर्गत महापालिकेतर्फे १८३६ महिला बचतगट तयार करण्यात आले आहेत. यापैकी १६०१ लाभार्थाना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच १२,२३२ लाभार्थाना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. बेघर व्यक्तींकरिता दोन बेघर निवारे उभारण्यात आले आहेत. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत नाशिक महापालिकेला शासनाने २९,७२१ चे उद्दिष्ट दिले होते. या अनुषंगाने ४०,७५५ (१३७%) पथविक्रेत्यांनी कर्जासाठी बँकेकडे ऑनलाईन अर्ज केलेले आहे. बँकांनी ३८,२२८ (१२८%) कर्ज मंजूर केलेले आहे. त्यापैकी ३७,००७ (१२५%) पथविक्रेत्यांना आतापर्यंत कर्ज वितरण केलेले आहे. दोन्हीही योजनांच्या अंमलबजावणीत महापालिका अग्रेसर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news