

नाशिक : दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा होणार असून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा पालखी मार्ग राहणार आहे. पालखी मार्ग शहरातूनही जाणार असल्याने पालखीतील सहभागी वारकरींसह वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. तसेच वाहनचालकांसाठी पर्यायी वाहतूक मार्गही देण्यात आले आहेत.
शहरातून पालखी सोहळा बुधवारी (दि. ११) जाणार आहे. सातपूर येथे बुधवारी मुक्काम केल्यानंतर गुरुवारी (दि.१२) सकाळी नाशिकरोडच्या दिशेने जाईल. तसेच रात्रीचा मुक्काम पळसे गाव येथे करणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.१४) पालखी सोहळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी शहरात १२ जूनला सकाळी ६.३० ते १४ जूनला सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढले आहेत. आदेशातील निर्बंध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमनदलाची वाहने यांना लागु राहणार नाही. तसेच ऐनवेळी परिस्थितीप्रमाणे वाहतुक वळविणे संदर्भात मार्गात बदल करण्याचे अधिकार राखुन ठेवण्यात आल्याचे अधिसुचनेत म्हटले आहे.
पिंपळगांव बहुला-समृध्दी टी पॉईंट-पपाया नर्सरी- चौक-महिंद्रा सर्कल- सातपुर गांव - सातपूर आय.टी.आय. सिग्नल- एबीबी सिग्नल- पंचायत समिती- जलतरण तलाव- मोडक सिग्नल- सिबीएस सिग्नल- मेहेर सिग्नल- अशोकस्तंभ- रविवार कारंजा- धुमाळ पॉईंट- गाडगे महराज पुतळा- दामोदर टॉकीज- बादशाही कॉर्नर- दुधबाजार चौक- म. फुले मंडई- काजीपुरा चौकी- विठ्ठल मंदिर- आझाद चौक-शिवाजी चौक- शितलादेवी मार्गे - गणेशवाडी पंचवटी पुढे - शितलादेवी मंदिर मार्गे शिवाजी चौक - व्दारका सर्कल- पुणेरोडने काठेगल्ली सिग्नल - फेम सिग्नल सम्राट सिग्नल उपनगर नाका- दत्तमंदिर सिग्नल - बिटको सिग्नल-मुक्तीधाम मंदिर परत विरूध्द बाजुने मुक्तीधाम मंदिर बिटको सिग्नल-छ. शिवाजी महराज पुतळा नाशिक रोड-सिन्नर फाटा- पळसेगांव
पालखी मार्ग असलेला एकेरी रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. दिंडीतील वाहने वगळून इतर वाहनांसाठी १२ ते १४ जूनला सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक मार्गातील बदल लागू राहणार आहेत.
मोडक सिग्नल-एबीबी सिग्नल ते सातपुर नाशिक या त्रंबककडे जाणाऱ्या एकेरी मार्गावरून दोन्ही बाजुने येणारी व जाणारी (दुहेरी) वाहतुक सुरू राहील.
अशोकस्तंभ ते मोडक सिग्नल कडे जाणा-या एकेरी मार्गावरून दोन्ही बाजुने येणारी व जाणारी (दुहेरी) वाहतुक सुरू राहील.
रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट गाडगे महाराज पुतळा जाणारी वाहतुक ही रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - नेहरू गार्डन मार्गे इतरत्र जातील.
गाडगे महाराज पुतळा ते बादशाही कॉर्नर जाणारी वाहतुक ही शालीमार खडकाळी सिग्नल मार्गे इतरत्र जातील
बादशाही कॉर्नर ते महात्मा फुले मार्केट कडे जाणारी वाहतुक ही गाडगे महाराज पुतळा शालीमार - खडकाळी सिग्नल - मार्गे इतरत्र जातील.
महात्माफुले मार्केट ते काजीपुरा पोलीस चौकी जाणारी वाहतुक दुधबाजार खडकाळी सिग्नल सारडा सर्कल मार्गे इतरत्र जातील.
नाशिक रोड ते व्दारका सर्कल या नाशिककडे जाणा-या एकेरी मार्गावरून दोन्ही बाजुने येणारी व जाणारी (दुहेरी) वाहतुक सुरू राहील.
व्दारका सर्कल कडुन जेल रोड कडे जाणारी वाहतुक व्दारका टाकळीरोड - इंदिरागांधी चौक येथुन जेल रोड मार्गे इतरत्र जातील.
संत श्री. निवृत्तीनाथ महाराज पालखी हि उपनगर सिग्नल पास झाले नंतर वाहतुक उपनगर सिग्नल येथुन डावीकडे वळून आम्रपाली नगर मार्गे जेलरोड कडे जातील.
दत्तमंदिर सिग्नल येथुन छ. शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणारी वाहतुक ही दत्तमंदिर सिग्नल येथुन उजवी कडे वळून सुराणा हॉस्पिटल आनंदनगरी टि पॉईन्ट, सत्कार पॉईन्ट, रिपोर्ट कॉर्नर येथुन रेल्वे स्टेशन, छ. शिवाजी महाराज पुतळयाकडे जातील.
पुण्याकडुन नाशिककडे येणारी व नाशिककडुन पुण्याकडे जाणारी सर्व जड, अवजड वाहने व एस. टी. बसेस दत्तमंदीर चौक येथुनच वीर सावरकर पुलावरून सिन्नर फाट्याकडे जाणार आहेत.