Niphad Temperature: महाबळेश्वरपेक्षाही निफाडमध्ये कडाक्याची थंडी! एका दिवसात पारा ७.४ अंशांनी घसरला

निफाड तालुक्यात कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरू असतानाच शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Cold Wave
Cold WaveFile Photo
Published on: 
Updated on: 

Niphad Temperature

लासलगाव : राकेश बोरा

निफाड तालुक्यात कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरू असतानाच शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अवघ्या एका दिवसात तापमानात तब्बल ७.४ अंशांची घसरण झाल्याने निफाड परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. निफाडचे तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी झाल्याचे तापमानाच्या नोंदीवरून दिसून येत आहे. दरम्यान, राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात 'अक्वान' चक्रीवादळ घोंघावत असून, आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम राज्यातील तापमानावर होत असताना निफाडमध्ये अचानक तापमानात मोठी घसरण झाली आहे.

Cold Wave
Nashik ZP Election | नाशिक जिल्हा परिषद आरक्षणात मोठा बदल! ओबीसी आरक्षणाला मोठा धक्का?

गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी निफाडचे किमान तापमान १३.९ अंश सेल्सिअस होते. गुरुवारी त्यात तब्बल ७.४ अंशांची घसरण होऊन पारा ६.५ अंशांवर पोहोचला. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत असून, स्वेटर, जॅकेट आणि शाल खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग वाढली आहे. थंडीच्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आदी आजारांच्या रुग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

रब्बी पिकांना दिलासा, द्राक्ष उत्पादकांची चिंता

वाढलेल्या थंडीचा कांदा, गहू, ज्वारी, हरभरा यांसह अन्य रब्बी पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, तापमानातील अचानक घसरण, कडाक्याची थंडी आणि दवबिंदू यामुळे द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

निफाडमधील किमान तापमानाचा आलेख (अंश सेल्सिअस)

५ नोव्हेंबर -१६.८

७ नोव्हेंबर -१२.७

११ नोव्हेंबर -१०.९

१४ नोव्हेंबर -११.५

१७ नोव्हेंबर -११.५

१९ नोव्हेंबर -१३.९

२० नोव्हेंबर -६.५

Cold Wave
Nashik Trimbakeshwar Road | नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण वेगात; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.