'NIMA Index-2024' | 'तेजस'ची बांधणी, 'जिंदाल'ची गुंतवणूक, आयटी कंपनीशी करार

'निमा इंडेक्स-२०२४' प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून घोषणा
'NIMA Index-2024' |
नाशिक : निमा इंडेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन फीत कापून करताना साकेत चतुर्वेदी, व्ही. चंद्रशेखरन, दीपक चंदे. समवेत धनंजय बेळे, अमित कुमार, सी. बी. सिंग यांच्यासह नाशिकमधील प्रतिष्ठित उद्योजक.Pudhari
Published on
Updated on

नाशिक : एचएएलकडून ट्रेनर (एचटीटी) आणि तेजस विमानांची बांधणी करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प, जिंदाल साॅ. लि.कडून मार्च २०२५ पर्यंत दोन ते तीन मोठे प्रकल्प आणि जागतिक स्तरावरील एका नामांकित आयटी कंपनीशी करार आदींबाबतच्या घोषणा निमा इंडेक्स-२०२४ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आल्या. नाशिक उद्योगांसाठी नेक्स्ट डेस्टिनेशन असल्याने, पुढील 10 वर्षांत नाशिक हे देशातील दुसरे 'बंगळुरू' असेल असेही सांगण्यात आले.

Summary

नाशिक होणार देशातील दुसरे बंगळुरू

- जागतिक स्तरावरील आयटी कंपनीशी करार

- 'जिंदाल'चे मार्च २०२५ पर्यंत दोन ते तीन प्रकल्प

- एअर बससमवेत एचएएलचा करार

- दोन वर्षांत ५० कार्गो सिपमेंट रवाना

- प्रदर्शनात मोठ्या गुंतवणुकीचे करार शक्य

नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमातर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित निमा इंडेक्सचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ६) करण्यात आले. या कार्यक्रमासाठी एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, जिंदाल सॉ. लि.चे चेअरमन व्ही. चंद्रशेखरन, दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी. बी. सिंग आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एचएएलचे साकेत चतुर्वेदी यांनी, एचएएल नाशिकमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांबाबतची माहिती दिली. एचएएलला गुड पार्टनरचा शोध असून, त्याबाबतचा शोध लवकरच एचएएलच्या टीमकडून घेतला जाईल. जिंदालचे व्ही. चंद्रशेखरन यांनी, मार्च २०२५ पर्यंत जिंदालकडून नाशिकमध्ये दोन ते तीन मोठे प्रकल्प उभारले जाणार असल्याचे स्पष्ट केले, तर दीपक चंदे यांनी, जागतिक पातळीवरील मोठ्या आयटी कंपनीशी करार करण्यात आला असून, याबाबतची अधिकृत घोषणा एप्रिल २०२५ मध्ये करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

व्यासपीठावर निमा अध्यक्ष धनंजय बेळे, बेदमुथा इंडस्ट्रीजचे विजय बेदमुथा, एसकेडीपीएलचे संजय देवरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, सहसंचालक प्रमोद शेळके, एमआयडीसीचे प्रभारी प्रादेशिक अधिकारी जयवंत पवार, निमाचे सचिव निखिल पांचाळ, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनीष रावल, आशिष नहार, राजेंद्र अहिरे आदी उपस्थित होते. आरजे परी यांनी सूत्रसंचालन केले, तर पांचाळ यांनी आभार मानले.

पाच हजार कोटींची गुंतवणूक : बेळे

नाशिकला गुंतवणुकीचा प्रवाह वाढावा यासाठी निमा इंडेक्स - २०२४ आदर्शवत असे व्यासपीठ आहे. रिलायन्सची ४,२०० कोटींची गुंतवणूक, इंडियन ऑइलची ५०० कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये होत आहे. नवीन औद्योगिक वसाहतींसाठी जिल्ह्यात दोन हजार एकर जागा तयार आहे. नाशिक हेच उद्योग विस्ताराचे नेक्स्ट डेस्टिनेशन ठरावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एचएएलच्या विस्तारित योजनांमध्ये नाशिकच्या व्हेंडर्सना संधी द्यावी, दीपक चंदे यांनी आयटी पार्कसाठी पुढाकार घ्यावा, जिंदालने नवीन प्रकल्प नाशिकमध्ये आणावेत अशी मागणी बेळे यांनी केली. तसेच आगामी सहा महिन्यांत नाशिकमध्ये पाच हजार कोटींहून अधिक गुंतवणूक येईल, असा विश्वासही व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news