Nilgai In Nashik | शिंदवडमधील डोंगराळ भागात पहिल्यांदाच निलगाय आढळल्याने शेतकरी आश्चर्यचकित

वन विभागाने लक्ष देण्याची मागणी
Nilgai Spotted Dindori
दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावाच्या परिसरात निलगाय (रोही) दिसून आल्याने कुतूहल Pudhari
Published on: 
Updated on: 

Nilgai Spotted Dindori

शिंदवड : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावाच्या परिसरात प्रथमच निलगाय (रोही) दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाजवळील डोंगराळ भागात ही निलगाय आढळून आली. या भागात यापूर्वी कधीही निलगाय दिसली नसल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदवड येथील शेतकरी तुकाराम मोरे हे नेहमीप्रमाणे आपल्या गाई चारण्यासाठी गावाजवळील डोंगरावर गेले होते. गाई चरत असताना त्यांना अचानक झुडपांमधून एक मोठा वन्यप्राणी फिरताना दिसला. हा प्राणी नेहमीच्या पाळीव जनावरांपेक्षा वेगळा असल्याने त्यांनी जवळून निरीक्षण केले. त्यावेळी तो निलगाय असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Nilgai Spotted Dindori
Nashik Swine Flu Cases | नाशिककरांना मोठा दिलासा; ऑक्टोबरच्या तीन आठवड्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांत लक्षणीय घट

शिंदवडसह आसपासच्या परिसरात यापूर्वी निलगाय आढळल्याची नोंद नसल्याने मोरे यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर या अनोख्या घटनेबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. परिसरातील वन्यजीवांच्या हालचालींबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या निलगायीच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच तिच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. वन्यजीवाला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नागरिकांनीही काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news