Nida Khan mobile forensic- निदा खानचा मोबाईल क्लोनसाठी फॉरेन्सिकला पाठविणार

परदेशी कनेक्शन, फंडिंग आणि डिलीट डेटा उघड करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण
Nida Khan
Nida Khan casepudhari
Published on
Updated on

नाशिक : टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व जबरदस्ती धर्मांतर प्रकरणाच्या तपासात आता विशेष तपास पथकाने तांत्रिक तपासावर भर दिला असून, मुख्य संशयित आरोपी निदा खान हिचा मोबाइल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या मोबाइलचे क्लोनिंग करून त्यामधील डिलीट करण्यात आलेली माहिती, व्हिडिओ, चॅट, कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Nida Khan
TCS Nashik case Nida Khan - निदा खानला न्यायालयीन कोठडी

तपास यंत्रणेनुसार, महिलांचे जबरदस्ती धर्मांतर करताना पाठविण्यात आलेले काही व्हिडिओ, सोशल मीडिया संदेश तसेच परदेशातील संपर्क आणि फंडिंगबाबत महत्त्वाची माहिती मोबाइलमधून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाइलचे सखोल तांत्रिक विश्लेषण करण्यात येणार असून, त्यासाठी तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

निदा खान ही या प्रकरणात मागील २५ दिवसांपासून फरार होती. विशेष तपास पथकाने तिला छत्रपती संभाजीनगर येथील नरेगाव परिसरातून ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर तिची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

Nida Khan
MHADA scam - म्हाडा घोटाळा : काजळे, पाटील यांची पोलिस कोठडी वाढली

दरम्यान, निदा खान ही गर्भवती असून, तिला तिसरा महिना सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यायालयाने घरच्यांच्या उपस्थितीत औषधोपचार घेण्यास दोन वेळा परवानगी दिली आहे. त्यामुळे तिची आई तिला दोन वेळा भेटू शकणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात एसआयटीकडून डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि परदेशी संपर्काच्या अनुषंगाने तपास अधिक वेगाने सुरू आहे.

क्लोनची गरज का?

निदा खानने पीडितांना पाठविलेले व्हिडिओ हे पीडितांच्या मोबाइलमध्ये आहेत. मात्र, निदा खानने ते डिलीट केलेले आहे. त्यासाठी पुरावा म्हणून सदर व्हिडिओ पुन्हा निदा खानच्या मोबाइलमध्ये अपलोड करण्यासाठी मोबाइल हा क्लोन केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news