Nashik Suicide Case | बँकेत नोकरीस असल्याचे भासवून लग्न; नवविवाहितेची आत्महत्या

Nashik Suicide Case | या प्रकरणी उपनगर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.
Women Suicide
Women SuicidePudhari
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

लग्नापूर्वी एसबीआय बँकेत कॅशियर असल्याची खोटी माहिती देत विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सासरच्या मानसिक छळाला कंटाळून २३ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देवळाली गावातील वडारवाडीत घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.

Women Suicide
Ozar Flyover Repair | "ओझरला उड्डाणपूल दुरुस्ती, सात दिवस नाशिक लेन बंद! धोकादायक भगदाडामुळे एकेरी वाहतूक व्यवस्था"

निशा राजू पवार (२३) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तिने मंगळवारी (दि. २८) सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तिचे भाऊ राहुल अशोक शिंदे (रा. नाशिक वेस, बारादारी रोड, सिन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात पती राजू गंगाराम पवार, अमोल राजू गायकवाड आणि सविता पवार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे व फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. निशा आणि राजू यांचा विवाह अवघ्या दोन महिन्यांपूर्वी झाला होता.

Women Suicide
Nashik Earthquake | "नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के! 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद"

विवाह ठरवताना राजू याने आपण एसबीआय बँकेत कॅशियर म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. मात्र, लग्नानंतर तो प्रत्यक्षात एका मॉलमध्ये काम करत असल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत पती राजू गंगाराम पवार (२७) आणि अमोल राजू गायकवाड (३०, रा. राणेनगर) यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.

मानसिक त्रास

या फसवणुकीमुळे आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे निशा नैराश्यात गेली होती. अखेर २८ जुलै रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news