NCMC card discount issue-'एनसीएमसी' कार्डधारक पहिल्याच दिवशी सवलतीपासून वंचित

मशीनमध्ये एरर; पूर्ण तिकीट काढण्याची वेळ
St Bus
St BusPudhari File Photo
Published on
Updated on

सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या प्रवासात सवलतीचा लाभविण्यासाठी एनसीएमसी कार्ड - सप्टेंबरपासून सक्तीचे केले आहे. नात्र, कार्ड सक्तीच्या पहिल्याच दिवशी कार्डधारक महिला व ज्येष्ठ नागरिकांना नांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने सवलतीच्या प्रवासाचा लाभघेण्यासाठी केलेली धावपळ व्यर्थ उरल्याचा अनुभव अनेक प्रवाशांना आला.

एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ दिली होती. त्यामुळे सवलतीस पात्र असलेल्या बहुतांश महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार चकरा मारून अखेर कार्ड मिळविले. कार्ड मिळाल्यानंतर सवलतीच्या प्रवासाचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा असताना सक्तीच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागला.

महामंडळाने कार्ड सक्ती करण्यापूर्वी त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा व्यवस्थित कार्यरत आहे की नाही, याची खात्री करणे गरजेचे होते. प्रवाशांनी नियमानुसार कार्ड काढून ठेवले असताना केवळ मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना सवलतीपासून वंचित ठेवणे योग्य नसल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

उसने पैसे घेऊन प्रवासाची वेळ

एसटी बसमध्ये एनसीएमसी कार्डद्वारे सवलतीचे तिकीट काढण्यासाठी वाहकांकडून मशीनमध्ये कार्डची नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अनेक वेळा प्रयत्न करूनही मशीनमध्ये 'एरर' येत असल्याने सवलतीच्या दराचे तिकीट काढता येत नव्हते. त्यामुळे वाहकही हतबल झाले. अखेर काही प्रवाशांना सवलतीऐवजी तिकिटाचे पूर्ण पैसे देऊन प्रवास करावा लागला

तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांना का?

एनसीएमसी कार्डधारक पात्र प्रवाशांच्या बाबतीत मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास वाहकाने रोख रक्कम स्वीकारून सवलतीच्या दरातील तिकीट देण्याची पर्यायी व्यवस्था महामंडळाने तातडीने करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच अशा व्यवहाराची नोंद घेण्यासाठी वाहकांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशीही मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news